लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आता दुसऱ्यांदाही होणार आई, म्हणाली ‘आता आरामाची गरज…’

एका बॉलिवूड अभिनेत्रीने लग्नाआधीच पहिल्या बाळाला जन्म दिला होता आणि आता ती पुन्हा एकदा प्रेग्नंट असून तिच्या या निर्णयाने तिने चाहतेहीआश्चर्यचकित झाले आहेत. सध्या तिला आरामाची गरज असल्याचं तिने म्हटलं आहे.

लग्नाआधी प्रेग्नंट राहिलेली ही बॉलिवूड अभिनेत्री आता दुसऱ्यांदाही होणार आई, म्हणाली आता आरामाची गरज...
Ileana DCruz pregnant for the second time
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 02, 2025 | 3:50 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच प्रग्नंट राहिल्या आहेत. आणि याचा खुलासा फार नंतर केला. अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री जी लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली होती.आती ही अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.

लग्नाआधीच प्रेग्नंट राहिलेली अभिनेत्री दुसऱ्यांदा आई 

ही अभिनेत्री म्हणजे इलियाना डिक्रूझ., इलियाना डिक्रूझची अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी लग्नाआधीच आई होण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाशिवाय आई होण्याच्या इलियाना डिक्रूझच्या या निर्णयाने सर्वांनाच अवाक केले होते. तथापि, इलियानाने याचा कधीही तिच्यावर परिणाम होऊ दिला नाही. इलियाना मायकल डोलनला डेट करत होती. आई होण्यापूर्वी, अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

पतीची ओळख बराच काळ लपवून ठेवली

इलियानाने एप्रिल 2023 मध्ये ती प्रेग्नंट असल्याची पोस्ट केली होती त्यानंतर तिने मे मध्ये प्रियकर मायकलसोबत गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. इलियानाने तिच्या पतीची ओळख बराच काळ लपवून ठेवली होती. दरम्यान इलियाना आता पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.

इंस्टाग्राम हँडलवर प्रश्नोत्तरांचं सेशन

इलियानाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर प्रश्नोत्तरांचं सेशन ठेवलं होतं ज्यामध्ये तिने चाहत्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट्स देखील दिले. एका युजरने इलियानाला विचारले की ती विवाहित आहे की लग्नाशिवाय तिला मूल झाले? इलियानाने युजरच्या या प्रश्नाचे उत्तर एका खास पद्धतीने दिले. तिने थेट सांगण्याऐवजी ती म्हणाली ‘हा एक अवघड प्रश्न नाही का?’ असं म्हणून तिने उत्तर देणं टाळलं. इलियाना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. अशा परिस्थितीत एका युजरने तिला विचारले की ती प्रेग्नेंसी आणि तिच्या पहिल्या लहान बाळाला एकत्र कसं सांभाळत आहे? यावर इलियानाने उत्तर दिले ‘मला खूप थकवा जाणवत आहे. आरामाची गरज आहे’


बॉलिवूडमध्ये कमबॅक कधी करणार?

इलियाना डिक्रूझने तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच एप्रिल 2023 मध्ये तिच्या पहिल्या गरोदरपणाची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत, इलियाना लग्नाशिवाय आई होणार म्हणून सर्वत्र खूप चर्चा रंगल्या होत्या. सध्या इलियाना तिच्या आईपणा अनुभव दुसऱ्यांदा अनुभवत आहे. शिवाय ती चित्रपटांपासूनही लांबच आहे. त्यामुळे ती पुन्हा कधी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार याची चाहते नक्कीच वाट पाहत आहे.