
मुंबई : आज नुकताच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (National Awards 2023) घोषणा करण्यात आलीये. या पुरस्कारांमध्ये RRR चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. देशातील सर्व पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वात मोठा मानला जातो. यामुळे या पुरस्कार विजेत्यांच्या यादीकडे सर्व देशाच्या नजरा लागल्या होत्या. नेहमीप्रमाणेच RRR आणि पुष्पा चित्रपट (Movie) बाजी मारताना दिसले. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार हा अल्लू अर्जुन याला मिळाला आहे. द कश्मीर फाइल्स चित्रपटाने देखील मोठ्या प्रमाणात बाजी मारल्याचे देखील बघायला मिळाले.
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी आता पुढे आलीये. यानुसार RRR चित्रपटाने तब्बल 5 पुरस्कार जिंकले आहेत. सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक (गायक), मनोरंजनासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्टंट दिग्दर्शन, सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन, सर्वोत्तम विशेष प्रभाव, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन श्रेणीत या पुरस्कारांचे नाव घेतले आहे. यामुळे RRR चित्रटाचा जलवा बघायला मिळाला.
विक्की काैशल याचा सरदार उधम चित्रपटाचा देखील जलवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बघायला मिळाला. या चित्रपटाने देखील अनेक पुरस्कार हे जिंकले आहेत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिळाला आहे. कंगना राणावत हिचे देखील नाव या पुरस्कारासाठी जोरदार चर्चेत होते. मात्र, कंगना ऐवजी क्रितीला पुरस्कार मिळाला.
2021 मध्ये रिलीज झालेला मिमी चित्रपटाने देखील आपला जलवा या पुरस्कारांमध्ये दाखवला आहे. मिमी चित्रपटासाठी क्रितीला पुरस्कार मिळालाय. फक्त क्रितीच नाही तर पंकज त्रिपाठीला देखील मिमी चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आलाय. कंगना राणावत हिच्या थलाइवी चित्रपटाला पुरस्कार मिळण्याची जोरदार चर्चा होती. मात्र, एकही पुरस्कार मिळवण्यात चित्रपटाला यश मिळाले नाहीये.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून अनेक पुरस्कार हे मिळताना दिसत आहेत. 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीमध्येही गंगूबाई काठियावाडीचे नावाचे वर्चस्व हे बघायला मिळाले आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामुळे आलिया भट्ट हिला खरोखरच एक वेगळी ओळख ही मिळाली आहे. आलिया भट्ट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यापासून चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.