IPS Anshika Verma : पहिला करवा चौथ नवरा सोबत नव्हता..मग IPS अंशिका वर्मा यांनी असं सोडलं व्रत

कर्तव्य बजावत असताना आपल्या आनंदाचा त्याग प्रत्येक पोलीसाला करावा लागतो. अंशिका वर्मा हिचे पहिले करवाचौथ तिला ड्युटीवर असल्याने साजरे करता आले नाही. करवाचौथ साजरा करतानाचे तिचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

IPS Anshika Verma : पहिला करवा चौथ नवरा सोबत नव्हता..मग IPS अंशिका वर्मा यांनी असं सोडलं व्रत
ips anshika verma
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 30, 2026 | 10:02 PM

करवा चौथ म्हणजे नटलेली नवरी, तिच्या हातावर नवऱ्याच्या प्रेमाने रंगलेली मेहंदी, चंद्राची वाट आणि पतीच्या हातून पाणी पिऊन व्रत सोडण्याचा खास क्षण! पण उत्तर प्रदेशातील IPS अंशिका वर्माला तिचा पहिला करवाचौथ नवऱ्यापासून दूर राहून सोडावा लागला. तिच्या नवऱ्याची पोस्टींग दुसर्‍या शहरात असल्याने तिला साधेपणाने हे करवाचौथ साजरे करावे लागले. याची पोस्ट तिने सोशल मीडियावर केली आहे.

IPS अधिकारी अंशिका वर्मा आणि तिचे पती IPS कृष्ण कुमार बिश्नोई म्हणजेच के.के. बिश्नोई. अंशिका वर्मा सध्या बरेली येथे एसपी साऊथ म्हणून कार्यरत आहेत, तर तिचे पती के.के. बिश्नोई हे बिजनौरचे पोलिस अधीक्षक आहेत. दोघांचीही वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोस्टिंग असल्याने करवा चौथच्या दिवशीही त्यांना भेटता आले नाही.

Loading...

 

त्यामुळे अंशिका वर्मा हिने व्हिडिओ कॉलवर आपला करवाचौथ साजरा केला. या कॉलचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला. के.के. बिश्नोई यांनीही हा खास क्षण आपल्या सोशल मिडिया स्टोरीवर पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी ‘Slient Sacrifices & Duty Calls’ असं कॅप्शन लिहिलं आहे. म्हणजेच काय कर्तव्य बजावत असताना करावी लागणारी शांत तडजोड आणि जिल्ह्याला असणारी गरज असा याचा अर्थ होतो.अंशिका हिने ही पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर केली आहे.

विशेष म्हणजे, या दोघांचे लग्न याच वर्षी 29 मार्च 2026 रोजी राजस्थानमधील जोधपूर येथे झालं होते. त्यामुळे लग्नानंतरचे हे त्यांचे पहिले करवा चौथ होते.

अंशिका वर्मा या 2021 बॅचच्या IPS अधिकारी असूम के.के. बिश्नोई हे 2018 बॅचचे अधिकारी आहेत. लग्नानंतरचे पहिले करवाचौथ असून देखील दोघांनी आपापवल्या जबाबदाऱ्यांना प्राधान्य दिलं. कमेंट्समध्ये चाहत्यांनी आर्शिवाद दिले आहेत. त्यासोबतच त्यांच्या त्यागाला सॅल्यूट केले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us