AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : वाकडमध्ये हृदयद्रावक घटना ! 18 व्या मजल्यावरून मारली उडी, माय-लेकाचा दुर्दैवी अंत

पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वाकडमध्ये एका मातेने तिच्या मुलासह 18 व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Pune News : वाकडमध्ये हृदयद्रावक घटना ! 18 व्या मजल्यावरून मारली उडी, माय-लेकाचा दुर्दैवी अंत
| Updated on: Oct 30, 2026 | 10:09 PM
Share

माणसाचं आयुष्य कधी कसं , कोणतं वळण घेईल हे सांगू शकत नाही. आज पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथे एका महिलेने तिच्या अवघ्या 6 वर्षांच्या मुलासह जीवनयात्रा संपवली. ती ज्या सोसायटीत राहत होती, तिथल्या 18 व्या मजल्यावरून तिने मुलासह खाली उडी मारत आयुष्य संपवलं. एकता भांगड आणि त्यांचा मुलगा माधव भांगड अशी त्यांची नावं असून मुलगा अवघ्या 6 वर्षांचा होता. घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मायलेकाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या चटका लावणाऱ्या मृत्यूने सगळेच हादरले आहेत.

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना तीन पानी सुसाईड नोट मिळाल्याची माहिती समोर आली आहे.आजारपणाला कंटाळून जीवन संपवत असून मुलगा मिस करेल, म्हणून त्याला सोबत घेऊन जीवन संपवत्ये, असं त्या महिलेने त्या नोटमध्ये लिहील्याची माहिती समोर आली आहे.

18 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत महिला एकता भांगड या पती मनोज भांगड आणि सहा वर्षांचा मुलगा माधव यांच्यासोबत वाकडमधील सिग्नेचर पार्क या सोसायटीमध्ये राहत होत्या. आज संध्याकाळी त्यांनी सोसायटीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारली. या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेत एकता आणि त्यांचा मुलगा माधव या दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे.

तीन पानी नोट लागली हाती

तपास सुरू असताना पोलिसांना घटनास्थळी तीन पानी सुसाईड नोट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या नोटमध्ये महिलेने आपल्या आजारपणाचा आणि मुलाच्या भविष्याबाबत वाटणाऱ्या चिंतेचा उल्लेख केल्याचं सांगितलं जात आहे. आजारपणाला कंटाळल्याचा तसेच आपल्या पश्चात मुलाला आपली आठवण येईल, या विचारातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा मजकूर नोटमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वाकड पोलीस याप्रकरणी अद्याप तपास करत आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान