The Song Of Scorpians | इरफान खानचा शेवटचा चित्रपट जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला!

| Updated on: Dec 29, 2020 | 1:57 PM

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) शेवटचा चित्रपट 'द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स' (The Song Of Scorpians) मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

The Song Of Scorpians | इरफान खानचा शेवटचा चित्रपट जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) शेवटचा चित्रपट ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ (The Song Of Scorpians) मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे. पॅनोरमा स्पॉटलाइट आणि 70 MM टॉकीज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. यावर्षीच इरफान खान यांचे निधन झाले आहे. हा चित्रपट अनूप सिंह दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची कथा एका आदिवासी तरूण महिलेवर आधारित आहे.(Irrfan Khan’s last film will be released in 2021)

या चित्रपटातील  महिला समाजातील रूढी परंपरेविरोधात आवाज उठवताना दिसणार आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खान एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पॅनोरामा स्पॉटलाइटचे निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक म्हणतात, “स्कॉर्पियन्सची ही एक विशेष कथा आहे. यामध्ये इरफान खानची शेवटची कामगिरी दिसणार आहे, खरोखर हा आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. आम्ही या चित्रपटात प्रेक्षकांसमोर भारतीय सिनेमाच्या लाडक्या स्टारला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. इरफान यांचा शेवटचा हा चित्रपट आम्ही दाखवत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.

70 MM टॉकीजचे निर्माता ज्ञान शर्मा म्हणतात की, जगातील सर्वोत्कृष्ट स्टारच्या चित्रपटासाठी आम्हाला निवडले गेले याबद्दल आम्ही भाग्यवान आहोत. आपल्याला सांगू इच्छितो की, 2021 च्या सुरुवातीस ‘द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स’ चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. इरफान खान यांचे निधन 54 व्या वर्षी 29 एप्रिल 2020 रोजी झाले. त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी शेवटता श्वास घेतला.

2003 मध्ये त्यांना हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2007 लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला होता. याशिवाय पानसिंग तोमर या 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. त्यांनी आतापर्यंत जवळपास ३० बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे.

2017 ला प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम या चित्रपटात त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होते. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला होता. भारत आणि चीनमध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाला होता. दुदैवाने हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

संबंधित बातम्या : 

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया

Hot Photos | ताराने बोल्ड अंदाजातला फोटो केला शेअर, फोटोवरुन हटणार नाही तुमची नजर!

(Irrfan Khan’s last film will be released in 2021)