
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कार्तिक आर्यन याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अनेक अभिनेत्रींसोबत कार्तिक आर्यन याचे नाव जोडले गेले. मध्यंतरी चर्चा होती की, कार्तिक आर्यन हा सारा अली खान हिला डेट करत आहे, त्यांचे काही फोटोही व्हायरल झाली. मात्र, दोघांनीही यावर भाष्य करणे टाळले. आम्ही अचानक भेटलो होतो आणि ते फोटो व्हायरल झाल्याचे साराने एका मुलाखतीत सांगितले. कार्तिक आर्यन याचा चित्रपट तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी 25 डिसेंबरला रिलीज झाला. विशेष म्हणजे त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. अनन्या पांडे हिच्यासोबत या चित्रपटात कार्तिक आर्यन रोमांन्स करताना दिसतोय. काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे गोव्यातील सुट्टीचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत.
कार्तिक आर्यनचे हे फोटो पाहून लोकांनी अंदाज लावला की, कार्तिक हा गोव्यात 18 वर्षीची यूकेत राहणारी करीना कुबिलियूट हिच्यासोबत होता. या चर्चादरम्यान करीना हिने कार्तिक आर्यन याची गर्लफ्रेंड असल्याचा नकार दिला. कार्तिकने यावर भाष्य करणे टाळले. आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन आणि करीना दोघे गोव्यातील सुट्टीदरम्यान एकाच हॉटेलमध्ये थांबले होते.
दोघांच्या रूम एकमेकांच्या शेजारीच होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे गोव्यातील एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. शिवाय बुकिंग टाईमिंगही एकसारखाच होता. फक्त दोघांनी वेगवेगळ्या रूम बुक केल्या होत्या. त्याच्यासोबतच हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनीही यावर शिक्कामोर्तब केले. कार्तिक आर्यन याच्यासोबत सतत नाव जोडले असता करीना हिने त्यावर भाष्य केले होते.
मी कार्तिक आर्यन याची गर्लफ्रेंड नसल्याचे तिने स्पष्ट म्हटले. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, दोघे एकाच हॉटेलमध्ये थांबले होते शिवाय त्यांच्या रूमही बाजूलाच होत्या. कार्तिक आर्यन याचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत जोडले आहे. मात्र, कार्तिक याने नेमका कोणाला डेट करत आहे, यावर भाष्य करणे कायमच टाळले आहे. कायमच कार्तिक आर्यन आपल्या खासगी आयुष्यावर भाष्य करणे टाळतो.