
जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतल्याचे सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली. 14 वर्षाच्या लग्नानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. जय भानुशाली याने माहीसोबत घेतलेल्या घटस्फोटावर भाष्य करणे टाळले. मात्र, माही सोशल मीडियावर सक्रिय आहे. माही आणि जय यांचा घटस्फोट नेमका कोणत्या कारणाने झाला हे कळू शकले नाही. मात्र, असे असले तरीही माही हिने काही दिवसांपूर्वीच म्हटले की, जय खूप चांगला माणूस आहे आणि त्याचे मन खूप जास्त मोठे आहे. आमच्यामध्ये काही गोष्टी जमत नव्हत्या. आम्ही दोघांनीही हे नाते टिकवण्यासाठी वेळ दिला. मात्र, ते होऊ शकले नसल्याने आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आम्ही आजही चांगले मित्र आहोत. आम्हाला दोघांनाही शांती हवी होती. कोणताही वादविवाद न करता आम्ही विभक्त झालो.
यादरम्यान माही हिने नदीम याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने नदीमला थेट आपले कुटुंब म्हटले होते. हेच नाही तर तुझ्यासोबत सुरक्षित वाटत असल्याचाही तिने उल्लेख केला होता.. तू मला प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वीकारल्याचेही तिने म्हटले. नदीम आणि माही एक आहेत… नदीम आय लव्ह यू. तू माझे मन, माझे घर, माझं कुटुंब आहेस.. असे माहीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले.
माही हिची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी थेट नदीम याच्यासाठीच माही हिने जय भानुशालीसोबत घटस्फोट घेतल्याचे सांगितले गेले. हेच नाही तर माही आणि जय भानुशाली यांची मुलगी तारा नदीमला आब्बा म्हणते… यामुळे मोठी खळबळ उडाली. यादरम्यान लोकांनी माही हिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ज्याला माही हिने थेट कॅमेऱ्यासमोर येत उत्तर दिले आणि ती चांगलीच संतापल्याचेही बघायला मिळाले.
यादरम्यान मोठा खुलासा करत माही हिने म्हटले की, होय… तारा नदीमला आब्बा म्हणते… नदीमला ताराने आब्बा म्हणावे, हे माझा आणि जय दोघांचा निर्णय होता. आमच्या दोघांचीही इच्छा होती की, ताराने नदीमला आब्बा म्हटले पाहिजे. तारा नदीमला आबा का म्हणते? यावर पहिल्यादाच माही विज हिने मोठा खुलासा केला आहे.