माही विज-नदीम यांच्या नात्यावर बोट ठेवणाऱ्यांना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर; म्हणाली ‘वडिलांसमान..’
माही आणि नदीम यांच्या नात्यावर बोट ठेवणाऱ्यांना अंकिता लोखंडेनं सडेतोड उत्तर दिलं आहे. नदीमसोबतच्या पोस्टवरून नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगनंतर माहीनेही तिचं कमेंट सेक्शन बंद केलं. आता अंकिताने तिच्या मैत्रिणीची बाजू घेतली आहे.

पती जय भानुशालीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्री माही विज तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. माहीने तिच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला केक भरवतानाचा फोटो पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. नदीम असं त्या व्यक्तीचं नाव आहे. माहीने तिच्या पोस्टमध्ये ‘आय लव्ह यू’ असंही लिहिलं होतं. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर माही आणि नदीम यांचं नातं जोडण्याचा प्रयत्न केला. अशांना आता माहीची खास मैत्रीण आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेनं उत्तर दिलं आहे. नदीम आणि माही यांचं नेमकं नातं काय आहे, हेसुद्धा तिने स्पष्ट केलं आहे.
अंकिता लोखंडेची पोस्ट-
‘मला आज काही बोलायचंय, एक सेलिब्रिटी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून.. लोक ज्याप्रकारे माही आणि नदीम यांच्या नात्याबद्दल कमेंट करत आहेत, ते पाहून मी खूपच अस्वस्थ झाले. मी माहीला ओळखते, मी नदीम यांना ओळखते आणि मी जयलासुद्धा चांगल्या प्रकारे ओळखते. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचं आहे की नदीम हे माही आणि जय यांच्यासाठी वडिलांसमान आहेत. तर तारासाठी ते वडीलच आहेत. एवढंच, यापलीकडे काहीच नाही. काही नाती आदर, प्रेम आणि वर्षानुवर्षांच्या विश्वासाने बांधलेली असतात. बाहेरच्यांना याबद्दल मतं बनवण्याचा कोणताच अधिकार नाही. एक मैत्रीण म्हणून मी हे सांगू शकते नदीमने कायम लोकांच्या कठीण काळात साथ दिली आहे आणि त्यात माझाही समावेश आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे’, असं अंकिताने स्पष्ट केलं.
या पोस्टमध्ये अंकिताने जय आणि माहीसाठी पुढे लिहिलं, ‘माही आणि जय.. तुम्ही पालक म्हणून खूप चांगलं काम करत आहात. जे लोक नकारात्मकता पसरवत आहेत, त्यांनी कृपया थांबावं. लोकांना त्यांचं आयुष्य जगू द्या. कर्म सगळं पाहतंय. माही.. आय लव्ह यू, जय.. आय लव्ह यू आणि नदीम.. तुम्ही खरंच बेस्ट आहात. आमच्यासारख्या अनेकांसाठी तुम्ही देवदूतापेक्षा कमी नाही.’

माहीची पोस्ट-
‘मी मनापासून निवडलेल्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक असा माणूस जो मी काहीही न बोलता माझं ऐकतो, जो मला त्याच्या गरजेसाठी नाही तर त्याच्या इच्छेनुसार पाठिंबा देतो. तू माझा कुटुंब आहेस. मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं. तू माझा कायमचा साथीदार आहेत. तू फक्त माझा सर्वांत चांगला मित्रच नाहीस तर माझा आधार, माझी शक्ती, माझं घर आहेस. मी दु:खी असो, आनंदी असो, भावूक असो किंवा अपूर्ण असो.. तू मला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारतोस. कधीकधी आपण एकमेकांवर रागावतो, भांडतो, कधीकधी दिवसभर बोलत नाही. पण ही शांतता नेहमी एकाच ठिकाणी येऊन संपते.. ते म्हणजे आपली मैत्री. कारण आपल्याला दोघांनाही माहीत आहे की नदीम आणि माही एक आहेत. नदीम.. आय लव्ह यू. तू माझं मन, माझं घर, माझं कुटुंब आहेस.. आज आणि नेहमीच’, अशी पोस्ट माहीने लिहिली होती.
