
मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : झगमगत्या विश्वातील अनेक रहस्य कायम जगासमोर येत असतात. जगभरातील इंडस्ट्रीमध्ये पुरुष कलाकारांच्या तुलनेत महिला कलाकारांना फार कमी मानधन मिळतं.. पण आता परिस्थिती बदलत आहे. बॉलिवूडसह जगात अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना आता त्यांच्या कामासाठी उत्तम मानधन मिळत आहे. हॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आता फक्त एका सिनेमातून कोट्यवधी रुपयांचा कमाई करतात. आज बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी अभिनयाशिवाय जाहिराती आणि इतर गुंतवणुकींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.
सेलिब्रिटींच्या रॉयल लाईफस्टाईलमुळे त्यांच्या श्रीमंतीबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. झगमगत्या विश्वात एक अशी अभिनेत्री आहे, जी अभिनेता सलमान खान आणि बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याच्यापेक्षा देखील गडगंज श्रीमंत आहे. तिच्या श्रीमंतीपुढे बॉलिवूडचे खान अभिनेते देखील फेल आहेत. (worlds highest paid actress)
सध्या ज्या अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल चर्चा रंगत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हॉलिवूडची अभिनेत्री जामी गर्ट्झ आहे. जामी गर्ट्झ हिच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे. रिपोर्टनुसार, जामी गर्ट्झ हिची एकूण संपत्ती ३ बिलियन युएस डॉलर म्हणजेच जवळपास २५ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जामी गर्ट्झ हे नाव हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नसली तरी, ती कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे.
हॉलिवूडमधील ज्युलिया रॉबर्ट्स, अँजेलिना जोली, जेनिफर एनिस्टन या अभिनेत्री जगप्रसिद्ध आहेत. जामी गर्ट्झ हिचा एकही सिनेमा हीट झालेला नाही. पण अभिनेत्रीने स्वतःचा व्यवसाय आणि गुंतवणुकीत्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. शिवाय पती टोनी रेसलर यांच्या व्यवसायातून देखील दोघांना मोठ नफा झाला आहे.
जामी एनबीए टीम अटलांटा हॉक्सचा भागिदार असून तिने अन्य व्यवसाय आहेत . जामी हिने १९७० मध्ये बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने १९८१ साली ‘इन्डलेस लव्ह’ सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. पण सध्या सर्वत्र अभिनेत्रच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.
अभिनेता शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. किंग खान याच्याकडे जवळपास ६ हजार ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे ३ हजार कोटींची संपत्ती आहे. तर अभिनेता सलमान खान याच्याकडे २ हजार ८०० कोटींची संपत्ती आहे. (Shah Rukh Khan net worth)