Janhvi Kapoor : आईची आठवण आणि हॅलोविनची थीम पण; जान्हवी कपूरने हुबेहूब साकारला ‘नगिना’ मधील श्रीदेवींचा लूक
Janhvi Kapoor : आपल्या आईला मानवंदना देण्यासाठी जान्हवी कपूरने 'नगिना' मधील श्रीदेवीचा तो लूक रिक्रिएट केला आहे. त्याशिवाय त्यावेळेचे प्रसिद्ध झालेले फोटो, व्हिडिओ यांचे सुद्धा रिक्रिएशन केले आहे. ज्यामुळे 90 च्या लोकांच्या जुन्या आठवणी, श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

बॉलिवू़डमध्ये सध्या हॅलोविनच्या पार्टिची तयारी सुरू झाली आहे . त्यामुळे कलाकार काही दिवसांतच क्रिएटिव्ह याशिवाय भयानक लूकमध्ये दिसतीलच. पण त्या आधीच जान्हवी कपूरने तिचा हॅलोविन लूक जाहीर केला आहे. जान्हवी आणि खूशी कपूरची आई श्रीदेवी हिचा 1986 मध्ये नगिना हा सिनेमा आला होता. ज्याने सर्वांच्या मनावर छाप पाडली. त्या सिनेमात श्रीदेवीसह, ऋषी कपूर, अमिरश पूरी यांच्याही भूमिका महत्वाच्या होत्या.
आपल्या आईला मानवंदना देण्यासाठी जान्हवी कपूरने 'नगिना' मधील श्रीदेवीचा तो लूक रिक्रिएट केला आहे. त्याशिवाय त्यावेळेचे प्रसिद्ध झालेले फोटो, व्हिडिओ यांचे सुद्धा रिक्रिएशन केले आहे. ज्यामुळे 90 च्या लोकांच्या जुन्या आठवणी, श्रीदेवीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. या सिनमध्ये ओरी ने ऋषी कपूरची भूमिका साकारली आहे. तर वैष्णव प्रवीणने अमरिश पूरी यांची भूमिका साकारली आहे. जान्हवीचा हा लूक केवळ हॅलोविन लूक केवळ फॅशन स्टेंटमेंट नसून आईंच्या आठवणींना दिलेली प्रेमळ आदरांजली ठरला आहे.
जान्हवीने या सगळ्याच्या पोस्ट इंन्स्टाग्रामवर केल्या आहेत. यामध्ये तिने श्रीदेवींनी नगिनासाठी परिधान केलेला तो गुलाबी रंगाचा ड्रेस ती ओढणी अगदी हुबेहुब वाटत आहे. याशिवाय त्यावरचे आकर्षक दागिने, मेकअप, हेअरस्टाईल अगदी सारखीच दिसत आहे. त्यामुळे साक्षात समोर श्रीदेवी असल्याचा भास होत आहे.
या फोटोशूटमध्ये जान्हवीची साथ तिचा मित्र ओरीने दिली आहे. त्याने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील पोस्टरसोबतच पडद्यामागील काही प्रसंग देखील रिक्रिएट केले आहेत. दिवगंत अभिनेते अमरिश पूरी यांची भूमिका वैष्णव प्रवीणने साकारली आहे. जान्हवीने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये आई श्रीदेवी, ऋषी कपूर आणि अमरिश पूरी यांचा खास उल्लेख केला आहे. ते तिघेही खास आहेत. असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
तिच्या या पोस्टवर सर्वांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.अनेकांना श्रीदेवींची आठवण झाली.तर काहींनी जान्हवीचे कौतुक केले आहेत. आईसाठी ही सर्वोत्तम आदरांजली असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टवर बहीण खूशी कपूरनेही प्रतिक्रिया दिली. 'तू हॅलोविन जिंकलंस, 'अशा शब्दात कमेंट्स केली आहे.
1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नगिना' चित्रपटात श्रीदेवी यांनी इच्छाधारी नागिणची भूमिका साकारली होती. ऋषी कपूर यांनी राजीवची भूमिका साकारली होती. तर अमरिश पूरी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. हरमेश मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट त्या वर्षांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
जान्हवी कपूरने या फोटोशूटसोबत शेअर केलेलं कॅप्शनही लक्षवेधी आहे. तिने लिहिलं आहे की "हॅलोविनच्या शुभेच्छा! चित्रपटातील सर्वात आयकॉनिक क्षणांपैकी एक क्षण साकारण्याचा मोह मला आवरला नाही. हॅलोविन म्हणजे केवळ भुताटकीचे किंवा मजेशीर कपडे घालण नाही, तर आपल्या आवडत्या व्यक्तिरेखा आणि पॉप कल्चरमधील खास क्षण पुन्हा साकारण्याची संधी आहे. कधी हे रूप मजेशीर असतं, कधी भीतीदायक तर कधी एखाद्याला दिलेली खास आदरांजली असते.
या पोस्टमध्ये जान्हवीने आपली आई श्रीदेवी, ऋषी कपूर आणि अमरिश पूरी यांचा उल्लेख केला आहे. " आई, ऋषी अंकल आणि अमरिश सर यांच्यापेक्षा जास्त आयकॉनिक कोण असू शकतं? " असं म्हणतं तिने या तिघांबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.