
Javed Akhtar: अफगानिस्तान या मुस्लीम देशात तालिबान शासनाने नवीन पीनल कोड लागू केला आहे. ज्यामध्ये पत्नीला मारहाण करणं कायद्याच्या विरोधात नाही… अफगानिस्तान येथील नवीन कायद्याने महिलांना जवळपास गुलाम घोषित केलं आहे. यावर संगीतकार जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे. तालिबानच्या या नव्या आणि निकृष्ट दर्जाच्या कायद्यानुसार, पत्नीला मारहाण करण्यास सूट दिली आहे. तर फक्त मारहान करताना हाड तुटलं नाही पाहिजे आणि कोणती जखम समोर दिसली पाहिजे… असं सांगण्यात आलं आहे. जावेद अख्तर यांनी या भयानक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत केवळ तालिबानवर टीका केली नाही तर भारतातील धार्मिक नेत्यांना धर्माच्या नावाखाली होणाऱ्या या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे आवाहन केलं आहे.
सोशल मीडिया प्लेटफॉर्म X (ट्विटर) वर तालिबानच्या नव्या निर्णयांना त्रासदायक सांगितलं आहे. एक्सवर जावेद अख्तर लिहितात, ‘तालिबानने पत्नीला मारहाण करण्यास सूट दिला आहे. अट फक्त एकच की हाड तुटलं नाही पाहिजे…’, जावेद अख्तर पुढे म्हणतात, ‘जर कोणती महिला पतीच्या परवानगी शिवाय माहेरी जात असेल तर, तिला तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल….’, संताप व्यक्त करत जावेद अख्तर यांनी प्रश्न उपस्थित केला की, ‘मुफ्ती आणि मौलाना यावर गप्प का आहेत?’
Talibans have legalised wife beating but with out any bone fracture. If a wife goes to her parent place with out the husband’s permission , she will be jailed for three months . I beseech the Mufties and mullas
Of India to condemn it unconditionally because it all is being done…— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 21, 2026
दुसऱ्या पोस्टमध्ये जावेद अख्तर म्हणतात, ‘राजकीय फायदा काहीही असो, आपण या कृतघ्न, क्रूर तालिबान्यांना कोणताही विश्वास किंवा आदर देऊ नये. ते जगाची घाण आहेत.’, सध्या जावेद अख्तर यांची पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.
What ever may be the political expediency these uncouth barbaric Talibans shouldn’t be given any credibility or respectability by us . They are the scum of the world .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 21, 2026
तालिबानने त्यांचा नेता हिबतुल्लाह अखुंदजादा याने स्वाक्षरी केलेला 90 पानांचा नवीन दंड संहिता लागू केल्याची बातमी समोर आली आहे. यामध्ये महिलांना गुलामाचा दर्जा देण्यात आला आहे. शिवाय, नवरा बायकोला मारु शकतो. बायकोला गंभीर मार लागल्यास ती तक्रार करु शकते. पण त्याचे पुरावे महिलेला न्यायलयात द्यावे लागतील. न्याय मागायला जाताना देखील महिलेला, तिच्या आई – वडिलांसोबत किंवा पतीसोबत जावं लागेल. शिवाय शरीरावर झालेल्या जखमा दाखवाव्या लागतील…