जया बच्चन यांची काजोलला मिठी, गालावर किसं; नेटकरी म्हणाले ‘ऐश्वर्यासोबत असं कधीच..’

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि काजोल यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या काजोलला मिठी मारून तिच्या गालावर किस करताना दिसून येत आहेत. या दोघींचं खास नातं पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जया बच्चन यांची काजोलला मिठी, गालावर किसं; नेटकरी म्हणाले ऐश्वर्यासोबत असं कधीच..
Jaya Bachchan and Kajol
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 11, 2024 | 1:21 PM

देशभरात सध्या दुर्गा पूजेची धूम पहायला मिळतेय. नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आवर्जून एकत्र येतात आणि देवीची पूजा करतात. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अभिनेत्री काजोलनेही यानिमित्त मुंबईतील सांताक्रूझमध्ये दुर्गा पूजेचं आयोजन केलं आहे. काजोल तिच्या कुटुंबीयांसोबत आणि फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांसोबत अत्यंत धूमधडाक्यात दुर्गा पूजा साजरी करते. यंदाही अभिनेत्री राणी मुखर्जी, अयान मुखर्जी, रणबीर कपूर यांसारखे सेलिब्रिटी देवी दुर्गाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. मात्र या सर्वांत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. जया आणि काजोल यांचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी जया बच्चन यांना ट्रोलसुद्धा केलंय.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की जया बच्चन या अत्यंत आनंदाने काजोलची भेट घेतात. हसत हसत तिला मिठी मारतात आणि तिच्या गालावर किस करतात. यानंतर दोघी बराच वेळ एकमेकींसोबत गप्पा मारताता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘जया बच्चन या सून ऐश्वर्याला सोडून सर्वांसोबत खुश दिसतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘दोघी एकाच स्वभावाच्या आहे, म्हणून दोघींचं खूप पटतं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘इतकं प्रेम स्वत:च्या सुनेवरही करायला पाहिजे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी टोला लगावला आहे.

पहा व्हिडीओ

जया बच्चन यांना त्यांची सून ऐश्वर्या रायसोबत कधीच इतक्या प्रेमाने वागताना पाहिलं नाही, अशी तक्रार नेटकऱ्यांनी बोलून दाखवली. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. जया यांचा तापट स्वभाव याला कारणीभूत असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अनेकांनी या व्हिडीओवर ऐश्वर्याबाबत कमेंट केली आहे.

दुर्गा पूजेदरम्यान काजोलने लाल आणि पिवळ्या रंगाची फ्लोरल साडी नेसली होती. त्यावर तिने स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता. तर जया बच्चन यांनी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. आणखी एका व्हिडीओमध्ये जया बच्चन आणि काजोल पापाराझींवर भडकताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघींचा स्वभाव एकसारखाच असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.