तो माझ्या समोर प्रायव्हेट पार्टला…, जॉनी लिव्हरच्या लेकीसोबत घडलेली धक्कादायक घटना

Johny Lever Daughter Jamie Lever: जॅनी लिव्हरच्या लेकीसोबत घडलेली धक्कादायक घटना, म्हणाली, 'तो माझ्या समोर प्रायव्हेट पार्टला...', अनेक वर्षांनंतर जॅनी लिव्हरच्या लेकीने सांगितला तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार...

तो माझ्या समोर प्रायव्हेट पार्टला..., जॉनी लिव्हरच्या लेकीसोबत घडलेली धक्कादायक घटना
फाईल फोटो
| Updated on: Jun 08, 2025 | 8:38 AM

Johny Lever Daughter Jamie Lever: अनेक सिनेमांमध्ये आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन करणारे जॉनी लिव्हर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. जॉनी लिव्हर यांच्याप्रमाणे त्यांची मुलगी जेमी लिव्हर देखील विनोद करत असते. तिचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जेमी हिने धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक वर्षांनंतर जॅनी लिव्हरच्या लेकीने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आाहे. त्या घटनेनंतर जेमीने कायम स्वतःला पुरुषांपासून दूर ठेवलं.

जेमी लिव्हर म्हणाली, ‘एकदा मी आणि माझी एक मैत्रिण कारमध्ये बसलो होतो आणि माझ्या भावाच्या येण्याची प्रतिक्षा करत होतो. आम्ही दोघी एकमेकींसोबत गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा एक मुलगा आला आणि आमच्या समोर उभा राहिला. एवढंच नाही तर त्याने मास्टरबेट करण्यास सुरुवात केली. ती पहिली वेळ होती जेव्हा मी कोणत्या पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट पाहिला असेल. तेव्हा मी इतकी लहान होती की तो काय करतोय मला कळत देखील नव्हतं.’

‘तेव्हा मी अचानक माझ्या मैत्रिणीला सांगितलं ‘तुझ्या मागे एक भयानक व्यक्ती उभा आहे आणि मला माहिती नाही की तो काय करतोय. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की दुर्लक्ष कर. पण मी प्रचंड घाबरलेली होती. माझे हात पाय कापायला लागले होते. मी हळूच कार लॉक केली. त्या पुरुषाला कळलं की आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही… अशात तो देखील तेथून निघून गेला. तेव्हा मी फक्त 10 – 12 वर्षांची असेल.’

एवढंच नाही तर जेमी हिने शाळेत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे. शाळातील बस कंडक्टरने देखील अनेकदा गैरवर्तन केलं. जेमी म्हणाली, ‘आमच्या शाळेत एक स्कूल कंडक्टर देखील होता. तो आम्हाला अत्यंत वाईट प्रकारे स्पर्श करायचा. खरंतर त्याने आमचं संरक्षण करायला हवं होतं. पण उलट तो आम्हाला वाईट प्रकारे स्पर्श करत होता. या सर्व घटना माझ्यासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होत्या. कॉलेजमध्ये देखील अशा अनेक घटना घडल्या होत्या…’ असा खुलासा देखील जेमी लिव्हर हिने केला.

जेमी लिव्हर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर जेमी विनोदी व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर जेमीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जेमी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील जेमीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.