AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छावानंतर लक्ष्मण उतेकरांचा मास्टरस्ट्रोक… श्रद्धा कपूर बनणार तमासगिरीण; या महान तमासगिरीणचं आयुष्य मोठ्या पडद्यावर…

'छावा' नंतर लक्ष्मण उतेकर यांचा मास्टरस्ट्रोक... प्रसिद्ध लावणी नृत्यांगनेचं खडतर आयुष्य येणार पडद्यावर, लावणी करताना प्रसुती वेदना, दगडाने नाळ ठेचली त्यानंतर..., अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार मुख्य भूमिकेत

छावानंतर लक्ष्मण उतेकरांचा मास्टरस्ट्रोक... श्रद्धा कपूर बनणार तमासगिरीण; या महान तमासगिरीणचं आयुष्य मोठ्या पडद्यावर...
फाईल फोटो
| Updated on: Jun 07, 2025 | 12:30 PM
Share

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. छत्रपती संभाजी महाराज याच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. आता ‘छावा’ सिनेमाच्या यशाच्या लक्ष्मण उतेकर प्रसिद्ध लावणी नृत्यांगनेचं खडतर आयुष्य पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून एका मराठी मुलीची भूमिका साकारणार आहे. सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर सिनेमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यांगना आणि ‘लावणा सम्राज्ञी’ म्हणून प्रसिद्ध, लोकप्रिय असलेल्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. पण जर हे खरं ठरलं तर श्रद्धाच्या कारकिर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक भूमिका ठरू शकते. ‘तमाशा: विठाबाईचा आयुष्याचा’ ही प्रसिद्ध मराठी कादंबरी विठाबाईंच्या जीवनाची कहाणी सांगते.

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या फक्त एक लावणी नृत्यांगना नव्हत्या तर, त्यांना आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला आहे. विठाबाई यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. गरिबी, समाजाच्या रूढीवादी विचारसरणीला आणि लावणी कलाकारांवरील लोकांच्या रागाला तोंड देत, विठाबाईंनी त्यांची कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला.

विठाबाई यांच्याबद्दल एक किस्सा प्रचंड प्रसिद्ध आहे. 9 महिन्यांच्या गरोदर असताना विठाबाई यांना लावणी करताना प्रसुती वेदना सुरु झाल्या. पण त्यांनी लावणी थांबवली नाही. एवढंच नाहीच तर, त्यांना कळलं होतं की, त्या कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकतात.

अशात तिव्र प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर विठाबाई मंचामागे गेल्या आणि बाळाला जन्म दिला. एवढंच नाही तर, गर्भ नाळ देखील विठाबाई यांनी दगडाने ठेचून काढली. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रेक्षकांसमोर लावणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सादरीकरण थांबवलं नाही कारम पूर्ण मानधन घेतलं होतं.

श्रद्धा कपूरचं मराठी कनेक्शन

श्रद्धा कपूरचं मराठी कनेक्शन जगजाहिर आहे. अभिनेत्रीचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे एक प्रसिद्ध गायक आणि कलाकार होते. श्रद्धा फार चांगलं मराठी बोलते. बायोपिकबद्दल सांगायचं झालं तर, याआधी देखील श्रद्धाने ‘हसीना पारकर’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमात श्रद्धाने दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेला न्याय दिलेला. पण सिनेमा मोठ्या पडद्यावर फेल ठरला.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी