Juhi Chawla | जुही चावला नव्हे ‘डर’साठी ‘या’ अभिनेत्रीची झाली होती पहिले निवड ? मग बिनसलं कुठे ? अनेक वर्षांनी झाला खुलासा

डर या चित्रपटात शाहरूखने नकारात्मक भूमिका केली होती. त्यामध्ये जुही चावला व सनी देओल हे दोघेही प्रमुख भूमिकेत होते.

Juhi Chawla | जुही चावला नव्हे डरसाठी या अभिनेत्रीची झाली होती पहिले निवड ? मग बिनसलं कुठे ? अनेक वर्षांनी झाला खुलासा
| Updated on: Jul 26, 2023 | 1:07 PM

Darr Movie : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांचा डर (Darr) हा चित्रपट खूप गाजला होता, हिटही झाला होता. शाहरुखची नकारात्मक भूमिका असलेला हा पिक्चर लोकांनाही खूप आवडला होता. यामध्ये सनी देओलही होता. पण लोकांना शाहरूख आणि जुहीची जोडी आवडली होती.

पण डर चित्रपटासाठी जुही चावला ही दिग्दर्शक यश चोप्राची पहिली पसंत नव्हती हे तुम्हाला माहीत आहे का? अनेक वर्षांनी याचा खुलासा झाला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही डरसाठी फिल्ममेकर यश चोप्राची पहिली पसंती होती. कॉस्च्युम डिझायनर नीता लुला यांनी याबाबत माहिती दिली आहे. एका मुलाखतीत त्या याबाबतीत बोलल्या आहेत. यश चोप्राच्या ऑफिसमध्ये त्या पहिल्यांदा ऐश्वर्याला भेटल्या होत्या, तिथे तिला चित्रपटाच्या लुक टेस्टसाठी बोलावण्यात आले होते.

डरसाठी ऐश्वर्याची झाली होती निवड

त्यांनी पुढे सांगितले की, मी ऐश्वर्याला पहिल्यांदा यशजींच्या ऑफिसमध्ये भेटले. तिला तिथे त्याला डरच्या कास्टिंगसाठी बोलावण्यात आले होते. पण याब्दल अनेकांना माहीत नसेल. यश चोप्रांनी मला बोलावलं आणि ऐश्वर्यासोबत लुक टेस्ट करायला सांगितले. जेव्हा मी तिला पाहिले आणि यशजींशी चर्चा केली तेव्हा आम्ही दोघेही म्हणालो की ती खूप सुंदर आहे. पण ती मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी जात असल्याने कदाचित ती काम करणार नाही, असे यश चोप्रा म्हणाले. आणि असंच झालं. ती त्या स्पर्धेसाठी गेली आणि चित्रपटात काम करू शकली नाही, असे नीता यांनी सांगितले.

ऐश्वर्यानंतर डर चित्रपटात जुही चावला झळकली होती. तिच्यासोबत शाहरुख खान आणि सनी देओल हे मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. शाहरुखच्या नकारात्मक भूमिकेचेही खूप कौतुक झाले.