झगमगत्या विश्वातील ‘सिंगल मदर’, ज्यांची बॉयफ्रेंडच नाही तर, पतीने देखील सोडली साथ

झगमगत्या विश्वातील 'सिंगल मदर', काहींची पतीने सोडली साथ, तर काहींनी मात्र लग्ना आधी घेतला आई होण्याचा निर्णय... अभिनेत्रींनी अनेक अडचणींवर मात करत झगमगत्या विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली.

झगमगत्या विश्वातील सिंगल मदर, ज्यांची बॉयफ्रेंडच नाही तर, पतीने देखील सोडली साथ
| Updated on: Jan 29, 2025 | 3:12 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक महिला सेलिब्रिटी आहेत, ज्यांना खासगी आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, त्या खचल्या देखील… पण अभिनेत्रींनी हार मारली नाही. सर्व प्रसंगांवर मात करत झगमगत्या विश्वातील काही अभिनेत्रींनी स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आणि ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ केलं.

सध्या ज्या अभिनेत्रींची चर्चा सुरु आहे, त्या मधील काही अभिनेत्रींनी लग्न केलं नाही. अभिनेत्रींनी लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. तर आज जाणून अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी सर्व संकटांवर मात करत मुलांचा योग्य रित्या सांभाळ केला.

अभिनेत्री जुही परमार : अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ – उतार आले. पण अभिनेत्री कधीच हार मानली नाही. अभिनेता सचिन श्रॉफ याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून लेकीचा सांभाळ करत आहे. दोघींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

एकता कपूर : टीव्ही विश्वाची क्विन एकता कपूर हिने देखील लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. एकता आता एकटी मुलगा रवी याचा सांभाळ करत आहे. एकता कपूर हिने 2019 मध्ये सरोगेसीच्या माध्यमातून रवीचं जगात स्वागत केलं.

अभिनेत्री साक्षी तन्वर : साक्षीने देखील लग्न न करता आई होण्याचा निर्णय घेतला. 2019 साली साक्षीने 9 महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतलं. अनेक ठिकाणी साक्षी तिच्या लेकीसोबत दिसते. साक्षी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारी : श्वेताने दोन लग्न केली. पण दोन्ही लग्नात अभिनेत्रीला अपयश मिळालं. आता अभिनेत्री सिंगल मदर म्हणून दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. श्वेताची मोठी मुलगी आणि अभिनेत्री पलक तिवारी हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण देखील केलं आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन : सुष्मिताचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतही अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने दोन मुलींना दत्तक घेतलं. सुष्मिताच्या दोन मुलींचं नाव रिना आणि अलीशा असं आहे.

अभिनेत्री उर्वशी ढोलकिया : म्हणजे टीव्ही विश्वातील कोमलिका… उर्वशी हिचं लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी झालं आणि १७ व्या वर्षी तिच्या खांद्यावर दोन मुलांची जबाबदारी पडली. पण अभिनेत्रीला पतीची साथ मिळाली नाही. आजही अभिनेत्री ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us