K-Pop Star Moonbin | आईच्या वाढदिवशीच संपवलं आयुष्य; अवघ्या 25 व्या वर्षी पॉपस्टारने उचललं टोकाचं पाऊल

| Updated on: Apr 20, 2023 | 3:55 PM

मूनबिनने फेब्रुवारी 2016 मध्ये ॲस्ट्रो या बँडसह के-पॉप इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्याआधी तो बालकलाकार आणि मॉडेलसुद्धा होता. ॲस्ट्रोशिवाय तो मूनबिन अँड सान्हा या सब-ग्रुपचाही भाग होता.

1 / 5
प्रसिद्ध के-पॉप बँड 'ॲस्ट्रो'चा सदस्य आणि के पॉपस्टार मूनबिन त्याच्या दक्षिण कोरियातील राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. अवघ्या 25 व्या वर्षी मूनबिनचं निधन झालं आहे. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

2 / 5
आईच्या वाढदिवशीच मूनबिनने या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनाच्या वृत्ताने के-पॉप इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.

3 / 5
मूनबिनने फेब्रुवारी 2016 मध्ये ॲस्ट्रो या बँडसह के-पॉप इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्याआधी तो बालकलाकार आणि मॉडेलसुद्धा होता. ॲस्ट्रोशिवाय तो मूनबिन अँड सान्हा या सब-ग्रुपचाही भाग होता.

मूनबिनने फेब्रुवारी 2016 मध्ये ॲस्ट्रो या बँडसह के-पॉप इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्याआधी तो बालकलाकार आणि मॉडेलसुद्धा होता. ॲस्ट्रोशिवाय तो मूनबिन अँड सान्हा या सब-ग्रुपचाही भाग होता.

4 / 5
येत्या मे महिन्यात दक्षिण कोरियात होणाऱ्या कॉन्सर्टमध्ये तो परफॉर्म करणार होता. याशिवाय त्याची आशिया टूरसुद्धा निश्चित झाली होती. मूनबिनच्या अशा अचानक जाण्याने के-पॉप इंडस्ट्रीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

5 / 5
झगमगत्या के-पॉप इंडस्ट्रीमागील काळ्या सत्याचीही सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे. या इंडस्ट्रीत तगडी स्पर्धा असते. अनेक वर्षे मेहनत करूनसुद्धा काहींना संधी मिळत नाही. ज्यांना संधी मिळते त्या कलाकारांचं खासगी आयुष्य जणू नाहीसंच होतं. सततचा तणाव, स्पर्धा यांमुळे येणारं नैराश्यही असं पाऊल उचलण्यामागचं कारण मानलं जातंय.