काही वर्षांपूर्वीचं आमचं लग्न मोडलं असतं…, अजय देवगणबद्दल काजोलचं मोठं वक्तव्य

Kajol And Ajay Devgan: काजोल आणि अजय यांचं लग्न केव्हाच मोडलं असतं... अनेक वर्षांनंतर काजोलने खासगी आयुष्याबद्दल केलाय मोठा खुलासा, काजोल आणि अजय कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत

काही वर्षांपूर्वीचं आमचं लग्न मोडलं असतं..., अजय देवगणबद्दल काजोलचं मोठं वक्तव्य
| Updated on: Jun 26, 2025 | 2:40 PM

जेव्हा बॉलिवूडच्या लोकप्रिय कपल्सची चर्चा रंगते तेव्हा सर्वात आधी अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांचं नाव समोर येतं. काजोल आणि अजय यांच्या लग्नाला 26 वर्ष झाली आहे. पण आजही दोघांमधील प्रेम कमी झालेलं नाही. अनेक ठिकाणी दोघे एकत्र दिसतात. शिवाय दोघां त्यांच्या नात्याबद्दल देखील कायम चाहत्यांना सांगत असतात. सध्या काजोल आगामी ‘मां’ सिनेमाचं प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी अभिनेत्रीने अजय याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

कोजाल हिला विचारण्यात आलं, अजय खूप कमी बोलतो आणि ती खूप बोलते. अशा परिस्थितीत, वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे दोन लोक एकमेकांशी कसं जुळवून घेतात? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी अनेकदा म्हणते की आनंदी वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला थोडं बहिरं व्हावं लागेल. तुम्हाला काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं. तुमच्या जोडीदाराबद्दल काही गोष्टी विसरणं खूप महत्वाचं आहे आणि काही गोष्टी न ऐकणं देखील फार महत्त्वाचं आहे.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अजय एक चांगला कुक आहे, त्याची खासियत अशी आहे की तो कोणत्याही गोष्टीची चव एकदाच चाखू शकतो. त्याला ती अगदी त्याच पद्धतीने कशी बनवायची हे माहित आहे. तो तुम्हाला त्याच्या रेसिपीतील गुप्त पदार्थ कधीच सांगणार नाही.’ याच कारणामुळे मी आणि अजय एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, म्हणून आम्ही आजही एकत्र आहोत.

 

 

‘अजय आणि मी पूर्णपणे वेगळे आहोत. नाही तर इतके वर्ष आम्ही कधीच एकत्र राहिलो नसतो. आधीच आम्ही विभक्त झालो असतो. आमच्या नात्यात डेटनाईट अशी कोणतीच गोष्ट नाही. आम्ही आमचा अधिक वेळ कुटुंबासोबत व्यतीत करतो. कारण कामामुळे आम्हाला फार कमी वेळ मिळतो. म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळतो तेव्हा आम्ही घरी सर्वांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो.’ असं देखील काजोल म्हणाली.

काजोल आणि अजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, जवळपास 4 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर काजोल आणि अजय यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर अजय – काजोल यांनी निसा आणि युग दोन मुलांचं जगात स्वागत केलं. सोशल मीडियावर अजय आणि काजोल कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.