2 वर्ष सोडा 2 महिने ही नाही टिकलं अभिनेत्रीचं लग्न; म्हणाली, ‘त्याने मला अनेकदा…’
Actress Love Life: पैसा आणि प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटी उचलतात मोठं पाऊल? अभिनेत्यासोबत लग्न करून 2 महिन्यात अभिनेत्रीच्या आयुष्यात वादळ, तर अभिनेत्याने देखील केले गंभीर आरोप

Actress Love Life: झगमगत्या विश्वात लग्न आणि घटस्फोट आता अत्यंत सामान्य झालं आहे. कधी सेलिब्रिटी लग्न करतील आणि किती वर्षांत नाही तर महिन्यात घटस्फोट घेतील सांगता येत नाही. असंच काही एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत झालं आहे. ‘सपना बाबुल का… बिदाई’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सारा खान आज अभिनेयापासून दूर आहे. पण तिच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते.
सारा खान हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 4’ मध्ये सारा खान हिने अली मर्चेंट याच्यावर प्रेम केलं आणि बिग बॉसच्या घराच सर्वांसमोर दोघांना लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर येतात दोघांचं नातं मोडलं.
विभक्त झाल्यानंतर सारा आणि अली यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले. अभिनेत्री म्हणाली, ‘त्याने एकदा नाही तर, अनेकदा माझी फसवणूक केली आणि मी नेहमी त्याला माफ करत राहिली. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर देखील त्याने माझी फसवणूक केली.’
सारा पुढे म्हणाली, ‘आमचे लग्न वैध नव्हतं. म्हणून मी ब्रेकअपचा निर्णय घेतला. त्यानंतर मी अनेक मुलांना डेट केलं.’ आता सारा पूर्वीप्रमाणे छोट्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.
View this post on Instagram
एका मुलाखतीत सारा म्हणाली, ‘मी अली याच्यासोबत लग्न केलं कारण मी त्याच्यावर प्रेम करत होती. अनेक जण म्हणाले की, मी पैशांसाठी अली सोबत लग्न केलं. अली सोबत लग्न एका वाईट स्वप्नासारखं होतं.’ एवढंच नाही तर, अली मर्चेंट याने देखील लग्नावर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘सारा सोबत लग्न ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती… प्रसिद्धीसाठी तिने माझ्यासोबत लग्न केलं…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.
सारा आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
