धंदा करना है…, लोकांनी घेरलेली मोनालिसा, त्रासलेले वडील म्हणाले, झोपडीत राहीलो आणि…
Mahakumbh Monalisa Viral Girl: धंदा करना है..., एका रात्रीत स्टार झालेली मोनालिसाचं आयुष्य, त्रासलेले वडील म्हणाले, 'तेव्हा आम्ही झोपडीत राहीलो आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोनालिसा हिची चर्चा...

महाकुंभ दरम्यान सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा आता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. महाकुंभमध्ये फुलांच्या माळा विकून एकारात्रीत प्रसिद्धीझोतात आलेल्या मोनालिसाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आता गर्दी करत असतात. आता मोनालिसाच्या भोवती कायम कॅमेरे असतात. दरम्यान, नुकताच झालेल्या मुलाखतीत मोनालिसाच्या वडिलांनी लेक व्हायरल झाल्यानंतर कशी परिस्थिती होती… याबद्दल सांगितलं आहे. मोनालिसाच्या कुटुंबियांना कठीण परिस्थितीचा देखील सामना करावा लागला आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत मोनालिसाचे वडील जय सिंह भोसले म्हणाले, ‘मी प्रयागराज याठिकाणी दुकान लावण्यासाठी गेलेलो. तेव्हा मोनालिसा म्हणाली मी देखील दुकान लावते आणि माळा विकते. तेव्हा आमच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की, तुमच्या मुली भोवती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.’
View this post on Instagram
‘मी विचार केला की माळा विकत घेण्यासाठी आले असतील. त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा माळा घेण्यासाठी नाही तर, कॅमेरेवाले तिच्या भोवती होते. मी विचार केला, माझ्या मुलीने असं काय केलं आहे, ज्यामुळे तिच्याभोवती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.’
‘प्रचंड गर्दी होती. तेव्हा मी मोनालिसाला एका चादरीत गुंडाळलं आणि घरी आणलं. मी सर्वांना सांगत होतो आम्हाला धंदा करुद्या. मी सर्व सामान उधारीवर घेतलं आहे. त्यानंतर एक पत्रकार मला म्हाला फक्त 5 मिनिटं मोनालिसा हिला भेटू द्या. त्यानंतर मी निघून जाईल. तेव्हा तो 25 लोकांना सोबत घेवून आला…’
View this post on Instagram
‘मोनालिसा हिने तर रागात एका पत्रकाराचा फोन देखील मोडला. आम्ही तीन दिवस एका झोपडीत राहिलो. साधी चपाती खाल्ली… मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर अनेक अडचणींचा सामना केला…’ असं देखील मोनालिसा हिचे वडील म्हणाले.
सांगायचं झालं तर, महाकुंभनंतर संपूर्ण सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओ आणि फोटोंची चर्चा रंगली आहे. तिचं पूर्ण नाव मोनालिसा भोसले असं आहे. कुंभमेळ्यात कुटुंबासोबत हार विकण्यासाठी आलेली मोनालिसा एका रात्रींत स्टार झाली. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता मोनालिसा लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
