प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हार्दिक पांड्याचे प्रेमसंबंध अखेर उघड, ती म्हणाली, ‘काही महिने हार्दीकसोबत…’
Hardik Pandya Love Life: हार्दीक पांड्या पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत, प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत प्रेमसंबंध अखेर उघड, अनेक वर्षांनंतर अभिनेत्री म्हणाली, 'काही महिने हार्दीकसोबत...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्ता हार्दीकच्या खासगी आयुष्याची चर्चा.

Esha Gupta On Dating Hardik Pandya: भारतीय क्रिकेटसंघाचा स्टार खेळाडू हार्दीक पांड्या कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्री आणि मॉडेल नताशा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक याचं नाव जास्मिन वालिया हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलेलं आहे. आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने हार्दीक याच्यासोबत असलेल्या नात्याचा मोठा खुलासा केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ईशा गुप्ता आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, ईशा गुप्ता हिने मोठा खुलासा केला आहे. हार्दिक पांड्या याच्यासोबत असलेल्या नात्यावर अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. ‘काही महिनी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. मला नाही वाटत की आम्ही एकमेकांना डेट केलं आहे. पण काही महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो… आमचं नातं पुढे जाईल की नाही… या टप्प्यात आम्ही होतो…’
View this post on Instagram
ईशा गुप्ता पुढे म्हणाली, ‘डेटिंगपर्यंत पोहोचण्याआधीच आमचं नातं संपलं. त्यामुळे जे होतं त्याला डेट म्हणू शकत नाही. आम्ही जवळपास दोन वेळा भेटलो असू…’ ईशा गुप्ता पुढे म्हणाली, तिला आशा होती की ती आणि हार्दिक पांड्या एक जोडपे बनू शकतील पण कदाचित ते त्यांच्या नशिबात नव्हतं.
दोघांमधील संवाद का झाला बंद?
यावर ईशा गुप्ता म्हणाली, ‘आम्हाला फक्त एकच गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे आम्ही एकसारखे नव्हतो. आम्ही एकमेकांसाठी योग्य नाव्हतो आणि प्रत्येकाचा एक प्रकार असतो. मला लाइमलाइटपेक्षा कुटुंब आणि वास्तविक जीवन जास्त आवडतं. मला माझ्या कामावर प्रेम आहे. कॅमेऱ्याच्या मागे ईशा गुप्ता नसते. मला घरी गेल्यानंतर आईला विचारायला अवडतं, काय सुरु आहे, आईचा ओरडा खायला अला आवडतं… हे सर्वकाही मला आवडतं…’ असं देखील ईशा म्हणाली…
ईशा गुप्ता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण ‘आश्रम’ वेबसीरिजनंतर ईशाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
