AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाहत्यांना फिटनेस टिप्स देणारा सलमान खान 3 गंभीर आजारांच्या विळख्यात; म्हणतो, प्रचंड वेदना होतात जेव्हा…

Salman Khan Health: वयाच्या 59 व्या वर्षी फिट दिसणारा सलमान खान 3 गंभीर आजारांचा करतोय सामना... चेहऱ्याचा रोग, धमन्यांमध्ये समस्या आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव... आजारांची नावं कधी ऐकली देखील नसतील...

चाहत्यांना फिटनेस टिप्स देणारा सलमान खान 3 गंभीर आजारांच्या विळख्यात; म्हणतो, प्रचंड वेदना  होतात जेव्हा...
फाईल फोटो
| Updated on: Jun 25, 2025 | 7:43 AM
Share

Salman Khan Health: अभिनेता सलमान खान याने नुकताच विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये सलमान त्याच्या आयुष्यातील काही पैलू, करीयर, इतर काही गोष्टी यावर बोलेलं असा अंदाज होता. अभिनेत्याने गोष्टींचे खुलासे तर केलेच, पण स्वतःला असलेल्या गंभीर आजारांबद्दल देखील सांगितलं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी फिट आणि चाहत्यांना फिटनेस टिप्स देणारा सलमान खान तीन गंभीर आजारांचा सामना करत आहे. मेंदूचा आजार ब्रेन एन्यूरिज्म, चेहऱ्याचा आजार ट्राइजेमिनल न्यूराल्जिया आणि धमन्यांमध्ये समस्या आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (AVM) या तीन आजारांचा अभिनेता सामना करत आहे.

सलमान खान गंभीर आजारांचा सामना करत असला तरी सिनेमांमध्ये ॲक्शन सीन करत असतो. या आजारांना किरकोळ मानणे चुकीचे ठरेल, विशेषतः AVM जे मेंदूमध्ये झाल्यास अत्यंत धोकादायक ठरू शकते. चला या विकारांना सविस्तरपणे समजून घेऊया.

ब्रेन एन्यूरिज्म (Brain Aneurysm) काय आहे?

मेयो क्लिनिक की रिपोर्टनुसार, ब्रेन एन्यूरिज्म न दिसणारी पण गंभीर समस्या आहे. जेव्हा मेंदूतील रक्तवाहिन्यांचा एक भाग कमकुवत होते आणि फुग्यासारखी फुगतो तेव्हा असं होतं. या सुजलेल्या रक्तवाहिनीला एन्युरिझम म्हणतात. जर ही रक्तवाहिनी फुटली तर मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरू होतो ज्याला ब्रेन हेमरेज म्हणतात आणि ते प्राणघातक ठरू शकते.

ट्राइजेमिनल न्यूराल्जिया (Trigeminal Neuralgia) काय आहे?

मेयो क्लिनिक की रिपोर्टनुसार, हा आजार चेहऱ्यावर अतिशय तीक्ष्ण आणि तीव्र वेदनांचा असतो. या वेदना चेहऱ्यावरील ट्रायजेमिनल नर्व्ह नावाच्या एका विशेष नसामध्ये जाणवतात. या नसेचं काम आपल्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागात स्पर्श, वेदना, उष्णता आणि थंडी यासारख्या संवेदना पोहोचवणं आहे.वेदना सहसा चेहऱ्याच्या एका बाजूला, गालावर, जबड्यात, ओठांवर, डोळ्याजवळ किंवा कपाळाजवळ, कधीकधी दातांजवळ किंवा कानांजवळ जाणवतात.

आर्टेरियोवीनस मॉलफॉर्मेशन (Arteriovenous Malformation-AVM) काय आहे?

मेयो क्लिनिक की रिपोर्टनुसार, हा एक दुर्मिळ पण गंभीर आजार आहे ज्यामध्ये शरीराच्या रक्तवाहिन्यांची रचना बिघडते. यामध्ये, धमन्या आणि शिरा एकमेकांशी थेट जोडल्या जातात, तर त्यांच्यामधील पातळ नळ्या, म्हणजेच केशिका, ज्या रक्ताचा दाब आणि प्रवाह नियंत्रित करतात, त्या नसा शरीरात नसतात…

जेव्हा रक्त थेट धमन्यांमधून शिरांमध्ये वाहते तेव्हा ते खूप उच्च दाब निर्माण करते. यामुळे शिरा फुटू शकतात, ज्यामुळे मेंदूत किंवा शरीराच्या इतर भागात रक्तस्त्राव होऊ शकतो. विशेषतः जर AVM मेंदूत असेल तर ते मेंदूतील रक्तस्त्राव, स्ट्रोक सारख्या घातक समस्या निर्माण करू शकतात.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा