काजोलने मुंबईतील सर्वात पॉश एरियात खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, किंमत जाणून थक्क व्हाल

काजोलने मुंबईतील एका पॉश भागात कोट्यावंधींची मालमत्ता खरेदी केली आहे. यात पाच कार पार्किंगची जागाही आहे. काजोलच्या या कोट्यावधी आलिशान घराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच तिने खरेदी केलेल्या घराची खरेदी किंमत जाणून तुम्ही चकित व्हाल.

काजोलने मुंबईतील सर्वात पॉश एरियात खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, किंमत जाणून थक्क व्हाल
Kajol Buys Crores Worth Property in Mumbai
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 12, 2025 | 12:46 PM

बॉलिवूडमध्ये सध्या कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी करण्यावर जास्त भर देत आहेत. अमिताभ बच्चन पासून ते आलिया भट्ट पर्यंत सर्वांनी कुठेना कुठे घर, जमिन अशा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. या लिस्टमध्ये अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनयाप्रमाणेच आपल्या मोकळेपणाने आणि खळखळून हसण्याने सर्वांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल.

मुंबईतील सर्वात पॉश एरियात खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी

काजोलने मुंबईतील सर्वात पॉश एरियात कोट्यवधींची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती काजोलची. काजोलने मुंबईत एक आलिशान घर विकत घेतलं आहे. सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे घर विकत घेताना तरी दिसत आहेत किंवा मग घर विकत तरी आहेत. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा आहे. आता यात काजोलचे नाव समाविष्ट झाले आहे.अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन या सेलिब्रेटींनंतर काजोलनेही घराचे व्यवहार केले आहेत.

किंमत ऐकून तुम्हीही चकित व्हाल

काजोलने मुंबईतील पॉश एरिया आलिशान घर विकत घेतले आहे. ज्याची किंमत ऐकून तुम्हीही चकित व्हाल. सध्या तिच्या या नव्या घराची चर्चा आहे. रिअल इस्टेट प्लॅटफॉर्म इंडेक्सटॅपच्या कागदपत्रांनुसार, काजोलने मुंबईच्या उपनगरात 28.78 कोटी रूपयांची रिटेल जागा खरेदी केल्याचे वृत्त आहे. इंडेक्सटॅपने मिळवलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांवरून काजोलने गोरेगाव पश्चिममध्ये 28.78 कोटींना एक व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली आहे.

खरेदीचा हा करार 6 मार्च 2025 ला झाला

मालमत्ता खरेदीचा हा करार 6 मार्च 2025 रोजी झाला. काजोलने 1.72 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्कही भरले आहे. या रिटेल जागेसाठी काजोलने 28.78 कोटी रुपये मोजले आहेत. यात पाच कार पार्किंगची जागा देखील आहे. याआधी काजोलने 2023 मध्ये ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये 7.64 कोटी रुपयांना ऑफिससाठी जागा खरेदी केली होती. ओशिवरा येथील वीरा देसाई रोड येथे बहुतांश सिनेकलाकारांची कार्यालये आहेत. त्याच परिसरात काजोलने हे कार्यालय खरेदी केले होते.

अजय देवगणचीही आहे मोठी गुंतवणूक 

काजोलप्रमाणेच तिचा नवरा तथा अभिनेता अजय देवगण यानेदेखील 2023 मध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. अजय देवगण याने पाच कार्यालयांची खरेदी केली होती. यापैकी तीन कार्यालयांची किंमत आता 30 कोटी 35 लाख रुपये इतकी तर उर्वरित दोन कार्यालयांची किंमत14 कोटी 74 लाख रुपये होती.