काजोलला घरबसल्या बॅंकेकडून मिळणार दर महिन्याला तब्बल 6 लाख 90 हजार… नक्की कारण काय?

अभिनेत्री काजोलने मुंबईतील तिच्या गोरेगाव येथील मालमत्तेमुळे इतका फायदा झाला आहे की तिला घर बसल्या तब्बल 6 लाख 90 हजार रुपये मिळणार आहेत. आणि वर्षाला घरबसल्या कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे. अशी तिने काय गुंतवणूक केली आहे हे जाणून घेऊयात.

काजोलला घरबसल्या बॅंकेकडून मिळणार दर महिन्याला तब्बल 6 लाख 90 हजार... नक्की कारण काय?
Kajol Smart Investment, Earns 6.9 rs Lakh Monthly from HDFC Bank Property Deal
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2025 | 3:55 PM

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटी आहेत ज्यांनी अनेक मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. तर काहींनी त्यांची प्रॉपर्टी कोणत्या ना कोणत्या कारणांनी भाड्याने दिली आहे. यात त्यांना प्रचंड फायदाही झालेला आहे. आता त्यात बॉलिवूड अभिनेत्री काजोलचाही समावेश आहे. होय आता काजोलने देखील तिच्या एका मालमत्तेची अशी काही गुंतवणूक केली आहे ज्यामुळे तिला घर बसल्या दर महिन्याला तब्बल 6 लाख 90 हजार मिळणार आहेत. नक्की तिने अशी काय गुंतवणूत केली आहे की तिला दरमहिन्याला एवढी रक्कम मिळणार आहे जाणून घेऊयात.

काजोलला कशातून झाला एवढा फायदा? 

बॉलिवूड अभिनेत्री काजोलने मुंबईतील तिची गोरेगावची मालमत्ता भाड्याने दिली आहे. अभिनेत्रीने ही मालमत्ता एचडीएफसी बँकेला नऊ वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. ज्यामुळे तिला लाखोंचे मासिक उत्पन्न मिळणार आहे. या कराराचा भाग म्हणून, काजोलने लाखो रुपये सुरक्षा म्हणून जमा केले आहेत. काजोलने अलीकडेच ही मालमत्ता कोट्यवधींना खरेदी केली होती.


दर महिन्याला तब्बल 6 लाख 90 हजार मिळणार आहेत

तिने मुंबईतील गोरेगावच्या ‘भारत अराईस’ या इमारतीमधील तिची मालमत्ता खरेदी केली होती. काजोलने ही 1 हजार 817 चौरस फूट रिटेल युनिटची मालमत्ता मार्च 2025 मध्ये 28.78 कोटी रुपयांना खरेदी केली होती. यात पार्किंग स्लॉटचाही समावेश आहे. तिने हीच मालमत्ता एचडीएफसी बँकेला नऊ वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. या करारामुळे तिला महिन्याला लाखो रुपयांचे आणि नऊ वर्षांत कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. काजोल आणि एचडीएफसी बँक यांच्यात करार 14 नोव्हेंबर 2025 रोजी करार झाला. या कराराची नोंदणी 5.61 लाख स्टॅम्प ड्युटी आणि 30 हजार नोंदणी शुल्कासह करण्यात आली आहे.या करारामुळे नक्कीच काजोलला दुप्पट फायदा झाला आहे. त्यामुळे आता तिला या गुंतवणूकीतून तिला दर महिन्याला तब्बल 6 लाख 90 हजार मिळणार आहेत.

काजोलच्या कामाबद्दल बोलायच तर…

काजोल शेवटची वेब सिरीज “द ट्रायल 2” मध्ये दिसली होती. सध्या ती तिच्या “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल” या टॉक शोमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ट्विंकल खन्ना देखील होस्ट करते. तिचा “महाराग्नी: क्वीन ऑफ क्वीन्स” हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट देखील पाइपलाइनमध्ये आहे. अहवालानुसार, प्रभु देवा आणि नसीरुद्दीन शाह देखील या चित्रपटात दिसू शकतात.