‘त्या जागेत भुताटकी,रात्रभर झोपू शकले नाही, देवानेच माझं रक्षण केलं’ काजोलने सांगितला शुटींगचा तो भयानक किस्सा

काजोल तिच्या आगामी 'माँ' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिने तिलाआलेला एक भयानक अनुभव सांगितला आहे. तिने एका जागेचा उल्लेख करत सांगितले की तिला या ठिकाणी नेहमीच अस्वस्थ आणि नकारात्मक अनुभव आले आहेत.

त्या जागेत भुताटकी,रात्रभर झोपू शकले नाही, देवानेच माझं रक्षण केलं काजोलने सांगितला शुटींगचा तो भयानक किस्सा
Kajol terrifying experience with Ramoji Film City
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 11:13 AM

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शुटींगच्या दरम्यान त्यांना आलेल्या काही पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटींबद्दल सांगितलं होतं. असाच एक किस्सा आता अभिनेत्री काजोलने देखील सांगितला आहे. सध्या काजोल तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे आणि अलीकडेच एका मुलाखतीत तिने एका जागेबद्दल सांगितले जिथे तिला फार अस्वस्थ वाटतं आणि नकारात्मक वाटतं.

काजोल हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रमोशनसाठी होती. तथापि, अभिनेत्रीने फिल्म सिटीबद्दल एक धक्कादायक गोष्ट उघड केली आणि म्हणाली की या ठिकाणी शूटिंग करताना तिला नेहमीच अस्वस्थ वाटते. काजोलने असाही दावा केला की रामोजी फिल्म सिटी झपाटलेली जागा आहे. तिथे काहीतरी भुताडकी आहे.

काजोलने रामोजी फिल्म सिटीला झटापलेलं म्हटलं 

एका मुलाखतीदरम्यान काजोलने सांगितले की म्हणाला, ‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटतं. काजोल म्हणाली, “नकारात्मक उर्जा किंवा भुतीया वाईब्स” आपण असं म्हणतो असं काहीतरी जाणवतं. कधी-कधी असं होतं की आपण अशा ठिकाणी जातो, तिथे आपल्याला अस्वस्थ वाटतं. अशा बऱ्याच ठिकाणी शुटिंग केलंय. जिथे व्यवस्थित झोपही आली नाही आणि तेथून लवकर निघून जावं वाटतं. याचं उत्तम उदाहरणं आपल्याकडे आहे, हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओ… जे जगातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक मानलं जातं. पण मला वाटतं की देवाने माझं रक्षण केलंय की मी आजपर्यंत काहीही पाहिलेल नाही” असं म्हणत तिला आलेला भयानक अनुभव तिने सांगितला.

हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चित्रीकरण झालंय

काजोलने रामोजी फिल्म सिटीमध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण केले आहे. हे फिल्म सिटी भारतातील सर्वात महत्त्वाच्या चित्रपट निर्मिती ठिकाणांपैकी एक आहे आणि बॉलिवूड, टॉलिवूड आणि अनेक भाषांमधील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे


अजय देवगणनेही शूटिंग केले आहे

याशिवाय, काजोलचा पती आणि अभिनेता अजय देवगण देखील याच ठिकाणी अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे आणि अलीकडेच तो तेलुगू ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’ मध्ये दिसला होता.

काजोलचा चित्रपट ‘मां’ चर्चेत 

दरम्यान, काजोल तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटात एका आईची भूमिका साकारत आहे, जी तिच्या मुलीचे रक्षण करण्यासाठी कोणाशीही लढण्यास तयार असते. या चित्रपटात अजय देवगण, ज्योती देशपांडे आणि कुमार मंगत पाठक यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट जिओ स्टुडिओज आणि देवगण फिल्म्स निर्मित आहे. या चित्रपटाची कथा सायविन क्वाड्रास यांनी लिहिली आहे.