भाऊ-बहीण बनून ओलांडल्या मर्यादा, अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श; काम्या पंजाबीचा थेट सवाल, ‘हे कसलं नातं?’
Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’मधील स्काऊट ओपी आणि लव्ह गिल यांचं नातं आता चर्चेचा केंद्रबिंदू बनलं आहे. याप्रकरणी आता अभिनेत्री काम्या पंजाबीने प्रतिक्रिया देत थेट सवाल उपस्थित केला आहे.

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात सध्या स्काऊट ओपी आणि लव्ह गिल यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. सुरुवातीला एकमेकांना भाऊ-बहीण मानणाऱ्या या दोघांमधील वाढती जवळीक पाहून प्रेक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आता लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी हिनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. स्काऊट ओपी आणि लव्ह गिल यांच्या शारीरिक जवळिकीवर प्रश्न उपस्थित करत तिने रिअॅलिटी शोमध्येही काही मर्यादा पाळल्या गेल्या पाहिजेत, असं स्पष्टपणे म्हटलं आहे. तिच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
नेमकं काय घडलं?
‘बिग बॉस 20’मध्ये युट्यूबर आणि गेमर स्काऊट ओपी म्हणजेच तन्मय सिंह आणि अभिनेत्री लव्ह गिल सुरुवातीपासूनच एकमेकांच्या जवळचे दिसत आहेत. स्काऊट अनेकदा लव्हची काळजी घेताना दिसला. त्याने लव्हला अनेकदा माझी बहीण म्हटलं होतं. त्यामुळे या दोघांमधील नातं भावंडांसारखं असल्याचं प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, अलीकडेच या समीकरणात वेगळं वळण आल्याचं पाहायला मिळालं. स्काऊटने सहस्पर्धक यंग डीएसए याच्याशी बोलताना लव्हबद्दल आपल्या मनात वेगळ्या भावना निर्माण झाल्याचं सूचित केलं. लव्हला दुसऱ्या स्पर्धकासोबत पाहिल्यावर आपल्याला राग येतो, असंही त्याने सांगितलं. यामुळे दोघांच्या नात्याबद्दल प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
काम्याची पोस्ट-
The transition from a “brother-sister” vibe to whatever this physical proximity is between Scout and Love Gill. Boundaries need to exist, even in a reality show. What exactly is going on here?
Casual fun or crossing the line?
#BiggBoss20— Kamya Punjabi Dang (@iamkamyapunjabi) October 8, 2026
काम्या पंजाबीने उपस्थित केले प्रश्न
स्काऊट आणि लव्ह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये स्काऊट लव्हला पायाने स्पर्श करताना दिसत आहे. याशिवाय दोघं एकमेकांसोबत अतिशय जवळीक साधताना दिसल्याने त्यांच्या वागण्यावर टीका झाली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काम्या पंजाबीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचं मत मांडलं. भाऊ-बहीण असल्याचं सांगण्यापासून ते अशा शारीरिक जवळिकीपर्यंत झालेला बदल आश्चर्यकारक असल्याचं तिने म्हटलं. रिअॅलिटी शोमध्येही मर्यादा असायला हव्यात. हे केवळ सहज केलेलं मस्करीचं वर्तन आहे की मर्यादा ओलांडल्या जात आहेत, असा सवाल तिने उपस्थित केला.
पहा व्हिडीओ-
स्काऊटच्या गर्लफ्रेंडचीही चर्चा
या संपूर्ण प्रकरणात स्काऊट ओपीची गर्लफ्रेंड काश्वी हिरानंदानी हिच्या प्रतिक्रियेकडेही प्रेक्षकांचं लक्ष आहे. स्काऊट आणि लव्ह यांच्या वाढत्या जवळिकीमुळे काश्वीच्या भावना काय असतील, याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान, स्काऊटच्या टीमने त्याच्या भावनांविषयीच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं होतं. शोमधील संवाद, प्रत्यक्षात झालेली चर्चा आणि त्याचा प्रेक्षकांनी काढलेला अर्थ या वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं टीमने म्हटलं आहे.