बॉलिवूडमध्ये कंगना पुन्हा मानधनाची 'क्विन'

मुंबई – कंगना राणावत नेहमीच काहीना काही निमित्ताने चर्चेत असते. यावेळी ती आपल्या मानधनाच्या रकमेवरून चर्चेत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी कंगनाने तब्बल 24 कोटींचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. कंगनाच्या‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील कामाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर तिच्या मानधनात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. …

Kangana Ranaut, बॉलिवूडमध्ये कंगना पुन्हा मानधनाची ‘क्विन’

मुंबई – कंगना राणावत नेहमीच काहीना काही निमित्ताने चर्चेत असते. यावेळी ती आपल्या मानधनाच्या रकमेवरून चर्चेत आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी कंगनाने तब्बल 24 कोटींचे मानधन घेतल्याची चर्चा आहे.

कंगनाच्या‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातील कामाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर तिच्या मानधनात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच आपल्या नव्या चित्रपटासाठी कंगनाने या 24 कोटी रुपये मानधन घेतले. जयललितांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट हिंदी आणि तामिळ अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट तामिळमध्ये ‘थलाइवी’ या नावाने, तर हिंदीत ‘जया’ नावाने प्रदर्शित होणार आहे. जयललितांच्या भूमिकेसाठी कंगनासोबतच अभिनेत्री विद्या बालन, ऐश्वर्या राय यांच्याही नावांची चर्चा होती. परंतु, दिग्दर्शकांनी कंगनाचे नाव निश्चित केल्याचे समजत आहे.

दरम्यान यापूर्वी कंगनाने ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाईंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तब्बल 14 कोटी मानधन घेतले आहे. त्यावेळी बॉलिवूडमध्ये कुठल्याही अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतले नव्हते. याबाबत बोलताना कंगनाने म्हटले आहे, की माझी फी माझ्या भूमिकेवर अवलंबून असते. प्रत्येक भूमिका वेगळी असते आणि त्यानुसार त्याचे मानधन ठरते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *