Kangana Ranaut | श्रीमंत उद्योजकासोबत कंगना अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

Kangana Ranaut | कायम वादाच्या भोवऱ्यात असणार कंगना आता लग्नामुळे चर्चेत. श्रीमंत उद्योजकासोबत अभिनेत्री कंगना रानौत एप्रिल २०२४ मध्ये अडकणार विवाहबंधनात! अभिनेत्री वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण... असं काय म्हणाली कंगना रनौत... कंगनाचं खासगी आयुष्य चर्चेत...

Kangana Ranaut | श्रीमंत उद्योजकासोबत कंगना अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
| Updated on: Sep 29, 2023 | 7:48 PM

मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या सिनेमांमुळे नाही तर, अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. श्रीमंत उद्योजकासोबत अभिनेत्री कंगना रानौत एप्रिल २०२४ मध्ये विवाहबंधनात अडकणार! असा दावा प्रसिद्ध अभिनेता आणि सिने-विश्लेषक कमाल राशिद खान उर्फ केआरके याने केला आहे. सध्या सर्वत्र कंगना रनौत हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. आता चाहते देखील कंगनाच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. लग्नाच्या चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. विमानतळावर अभिनेत्रीला स्पॉट करण्यात आल्यानंतर अभिनेत्रीला लग्नाबद्दल प्रश्नविचारण्यात आला.

कंगना हिने लग्नाबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही. पण अभिनेत्री पापाराझींना म्हणाली, ‘मी तुमच्यापासून लपून घरातून निघते. तरी देखील तुम्ही माझ्या एक पाऊल पुढे आहात…’ अभिनेत्रीच्या अशा वक्तव्यानंतर कंगना हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला केआरके?

केआरके ट्विट करत म्हणाला, अभिनेत्री कंगना रनौत हिचा साखरपुडा डिसेंबर २०२३ मध्ये उद्योजकासोबत होणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये कंगना विवाहबंधनात अडकणार आहे…! तिला खूप शुभेच्छा…!’ अभिनेत्याच्या ट्विटवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत… पण यावर कंगना हिने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही…

लग्नाबद्दल काय म्हणाली कंगना रनौत?

एका मुलाखतीत कंगना रनौत हिने लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि ती माझ्या आयुष्यात येणार असेल तर येईल.. मला लग्न करायचं आहे. माझं कुटुंब असेल अशी माझी देखील इच्छा आहे.. पण सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर होईल…’ असं अभिनेत्री म्हणाली होती..

कंगना रनौत हिचे आगामी सिनेमे

कंगना रनौत हिच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीचा‘चंद्रमुखी २’ सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. एवढंच नाही तर सिनेमा ऑनलाईल लीक झाल्याची देखील चर्चा रंगली आहे. शिवाय अभिनेत्री ‘तेजस’ सिनेमा देखील २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एवढंच नाही तर, ‘इमरजेन्सी’ सिनेमात देखील कंगना महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

कंगना सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर कंगनाच्या फॉलोअर्स आणि ट्रेल्सची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते.