
मुंबई | बॉलिवूडमध्ये काही असे कुटुंब आहेत, ज्यांच्या अनेक पिढ्या झगमगत्या विश्वात सक्रिय आहेत. अशाच कुटुंबांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंब.. कपूर कुटुंबाच्या अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. कपूर कुटुंबात होणारे कार्यक्रम, लग्न सोहळे किंवा नव्या पाहुण्याचं आगमन… इत्यादी गोष्टींमूळे कपूर कुटुंबाच्या चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगत असतात. पण आता मात्र चर्चा रंगत आहे, ती म्हणजे कपूर कुटुंबाच्या मोठ्या मुलीची. अनेकांना असं वाटतं की अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर यांनी कपूर कुटुंबाच्या लेकी असूनही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण करीश्मा, करीना यांच्या आधी देखील कपूर कुटुंबातील मोठ्या मुलीने बॉलिवूडमध्ये काम केलं आहे.
पण कपूर कुटुंबाची मोठी लेक आता कुठे आहे, ती काय करते? याबद्दल फार कमी माहिती मिळते. कपूर कुटुंबाच्या मोठ्या मुलीचं नाव संजना कपूर असं आहे. संजना कपूर देखील करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्याप्रमाणेच प्रचंड सुंदर दिसते. सुंदर आणि उत्तम अभिनय कौशल्य असताना देखील संजना बॉलिवूडमध्ये अधिक काळ राज्य करू शकली नाही.
अखेर संजना कपूरने बॉलिवूडचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शशी कपूर यांची मुलगी संजना ही कपूर कुटुंबातील पहिली मुलगी आहे.पण संजना इंडस्ट्रीत स्वतःची ओळख आणि स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरली. अशात करिश्मा कपूर आणि करीना कपूरने इंडस्ट्रीत एन्ट्री केल्यानंतर संजना अचानक गायब झाली.
करिश्मा कपूर आणि करीना कपूर या कपूर कुटुंबातील पहिल्या मुली आहेत असं अनेकदा समोर आलं, पण शशी कपूर यांची मुलगी संजना कपूर कुटुंबाची पहिली लेक आहे. शशी कपूर यांनी ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत प्रेमविवाह केला होता. शशी कपूर आणि जेनिफर यांनी तीन मुलं आहेत. त्यामधील एक म्हणजे संजना कपूर..
संजना कपूर हिने वयाच्या १७ व्या अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हिरो हिरालाल’ सिनेमात नसीरुद्दीन शाह आणि संजना कपूर यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यानंतर ती सलाम मुंबईमध्येही दिसली. ती सर्वात सुंदर अभिनेत्री होती.
पण फार कमी सिनेमांमध्ये झळकल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकत रंगभूमीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.. एवढंच नाही तर. संजना कपूरला २०२० मध्ये रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले होते. कपूर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेली असते…