‘आई झाल्यानंतर सगळं बदललंय’, ग्लॅमरस बेबोची दिनचर्या कशी असते? 9.30 ला घरातील लाइट्स बंद

करीना कपूर खानने दोन मुलांना जन्म दिल्यानंतर तिच्या आयुष्यात आणि कामाच्या पद्धतीत झालेल्या बदलंबद्दल माहिती दिली. तिने तिच्या फिटनेस आणि डाएटबाबतचे नियम, तसेच तिची नवीन जीवनशैली आणि कुटुंबासाठी वेळ कसा काढते याबद्दल स्पष्ट केलं आहे.

आई झाल्यानंतर सगळं बदललंय, ग्लॅमरस बेबोची दिनचर्या कशी असते? 9.30 ला घरातील लाइट्स बंद
kareena kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 03, 2025 | 6:24 PM

बॉलिवूड अभिनेत्री आपल्या फिटनेसच्याबाबतीत,आपल्या डाएटबाबत किती काटेकोर असतात हे सर्वांना माहित आहे. यामध्ये अनेक अभिनेत्री अशाही आहेत ज्यांनी आई झाल्यानंतरही आपल्या फिटनेसची योग्य ती काळजी घेतली आहे. त्यात करीना कपूरचं नाव तर असतंच. करीना जरी खवय्या असली तरी ती आपल्या फिटनेसची किती काळजी घेते हे सर्वांना माहित आहे. चाहते तिला तिच्या डाएटसाठी फॉलो करतात. आई झाल्यानंतरही करीनाने आपल्या फिटनेसची काळजी घेतली आहे.

दोन मुलांची आई झाल्यानंतर करीनाच्या प्राध्यक्रमच बदलला

दरम्यान याबद्दल करीनाला विचारण्यात आलं तेव्हा करीनाने ती आई झाल्यानंतर तिच्यात काय काय बदल झाले याबद्दल सांगितलं आहे.करीना कपूर खान म्हणाली की एक काळ असा होता की ती वर्षाला 4 ते 5 चित्रपट करायची, पण आता तैमूर आणि जेह या दोन मुलांची आई झाल्यानंतर तिने तिच्या कामाची पद्धत बदलली आहे. एवढेच नाही तर तिने तिची जीवनशैलीही पूर्णपणे बदलली आहे.

‘मी भूमिकांचा पाठलाग करणे सोडून दिलं आहे’

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “आता मी भूमिकांमागे धावणे थांबवले आहे. मी पाहते की तरुण अभिनेत्री एक चित्रपट पूर्ण करतात आणि नंतर दुसरा चित्रपट करायला सुरुवात करतात. माझ्या आयुष्यातील तो टप्पा संपला आहे याचा मला आनंद आहे. मी कमी चित्रपट करू शकते, पण मी ते विचारपूर्वक करते. आता मी कधी आणि किती काम करायचे हे ठरवते. आता अॅवॉर्ड शोमध्ये येण्यासाठी मी माझ्या मुलांना एकटे सोडू शकत नाही ”

आई झाल्यानंतरची जीनशैली

तिच्या जीवनशैलीतील बदलांबद्दल बोलताना करीना म्हणाली, “मी सकाळी लवकर उठते आणि व्यायाम करते. मी माझा वेळ स्वतःवर घालवते. आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवण करतो आणि आमच्या घरातील दिवे रात्री 9.30 वाजता बंद होतात.”


कुटुंबासाठी वेळ

करीनाने सांगितले की जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र असते तेव्हा ते एकत्र स्वयंपाक घरातच असतो. करिना म्हणाली, “आम्ही सर्वजण स्वयंपाकघरात असतो. सैफला केरळचे जेवण खूप आवडते. तो इडियाप्पम आणि नारळाच्या ग्रेव्ही स्टूजचा आस्वाद घेत राहतो. मला दिवसातून एकदा भारतीय जेवण घ्यावेच लागते. हा माझा नियम आहे.” तर अशापद्धतीने करीना तिचा कौटुंबिक वेळ अनुभवताना दिसत आहे. तसेच ती त्यात रमलेलीही दिसत आहे.

कामाबद्दल बोलायचं तर…

2024 मध्ये करीनाचे दोन चित्रपट आले होते ‘क्रू’ आणि ‘सिंघम अगेन’ दोन्ही चित्रपट हिट ठरले. सध्या करीना मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ या चित्रपटात काम करत आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत पृथ्वीराज दिसणार आहे.