Kareena Kapoor | आयुष्यात पुढे काय होणार? करीना कपूर हिच्याकडून मोठी हिंट

Kareena Kapoor | 'हा शेवट नाही...', करीना कपूर हिच्या लक्षवेधी पोस्टकडे थांबल्या अनेकांच्या नजरा, असं काय म्हणाली अभिनेत्री? सध्या सर्वत्र करीना कपूर हिची चर्चा.. अभिनेत्री सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र व्हायरल... चाहते कमेंट करत देत आहेत प्रतिक्रिया...

Kareena Kapoor | आयुष्यात पुढे काय होणार? करीना कपूर हिच्याकडून मोठी हिंट
| Updated on: Oct 08, 2023 | 9:48 AM

मुंबई | 8 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. करीनाच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील आहे. करीना हिचं सौंदर्य, अभिनय.. इत्यादी गोष्टी चाहत्यांना आकर्षित करत असतात. लग्नानंतर देखील करीना बॉलिवूडमध्ये सेक्रिय आहे. तर अनेक अभिनेत्रींनी लग्न आणि मुलांची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर बॉलिवूडच्या निरोप घेतला. पण करीना हिने करीयरकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही. चाहते आजही करीना हिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. अशात अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने मोठी माहिती चाहत्यांना दिली आहे.

करीना हिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचा आहे. फोटोमध्ये करीना एका ठिकाणी उभी आहे. तर एक गाडी हवेत उडताना दिसत आहे. त्यामुळे करीना चर्चेच आहे. करीना कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडमोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता देखील आयुष्यातील मोठ्या गोष्टीची माहिती अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

करीना लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम 3’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘मला सांगायची गरज आहे का, मी कोणत्या सिनेमाचं शुटिंग करत आहे? तो माझ्या सर्वात आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्याच्यासोबत माझा चौथा सिनेमा आहे… नक्कीच हा शेवट नाही… रेडी स्टेडी गो…’ असं लिहिलं आहे.

 

सोशल मीडियावर सर्वत्र अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अभिनेता रणवीर सिंग याने कमेंट केली आहे. अभिनेता म्हणाला, ‘रोहित सरांसोबत तुमचा चौथा असेल, पण माझा तुमच्यासोबत पहिलाचं सिनेमा आहे.’ सध्या सर्वत्र करीना आणि तिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे.

करीना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री नव्या पोस्टमुळे चर्चेत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टनंतर ‘सिंघम 3’ सिनेमासाठी चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us