
बॉलिवूड सेलिब्रिटींसारखे दिसणारे काही लोक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. आज आम्ही तुम्हाला करिष्मा कपूर (Karishma Kapoor) या अभिनेत्री सारखी दिसणारी व्यक्ती दाखवणार आहोत. या व्यक्तीचं नाव आहे हीना खान. हीना ही एकदम करिश्मासारखी दिसते.

करिश्मा कपूर सारखी दिसणारी हीना बरीच प्रसिद्ध आहे. टिकटॉकवर हीनानं बरीच प्रसिद्धी मिळवली होती, आता ती इन्स्टाग्रामवर करिश्मा कपूरसारखे व्हिडीओ शेअर करते.

हीनाचा चेहरा आणि व्हिडीओ बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसारखे आहेत. तिचे व्हिडीओ पाहून लोकही चकित झाले आहेत.

हीना पाकिस्तानची असली तरी तिला भारतात खूप पसंत केलं जातंय. हीना फक्त करिश्मा कपूरसारखे व्हिडीओ तयार करते.

हीना स्वत:चे वर्णनही करिश्मा कपूरची सर्वात मोठी फॅन आहे, असं करते. तिनं करिश्मा कपूरचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केले आहेत.