21 व्या वर्षी करिश्माने दिलं होतं सर्वात सुपरहिट गाणं, 30 वर्षानंतर देखील प्रचंड क्रेझ, ऐकू येताच…

करिश्मा कपूरने वयाच्या 21 व्या वर्षी दिलं होतं सर्वात सुपरहिट गाणं. जे गेल्या 30 वर्षांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत. आजही ते गाणं ऐकू येताच दिवसभर गुणगुणतात लोक.

21 व्या वर्षी करिश्माने दिलं होतं सर्वात सुपरहिट गाणं, 30 वर्षानंतर देखील प्रचंड क्रेझ, ऐकू येताच...
| Updated on: Nov 04, 2026 | 7:58 PM

90 च्या दशकातील बॉलिवूड गाण्यांची जादू आजही संगीतप्रेमींच्या मनावर कायम आहे. त्या काळात अनेक अशी गाणी प्रदर्शित झाली, जी ऐकताच आजही जुन्या आठवणी ताज्या होतात. असेच एक लोकप्रिय गाणे म्हणजे गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेले ‘दिल जाने जिगर तुझ पे निसार’. विशेष म्हणजे, हे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा करिश्मा कपूर अवघी 21 वर्षांची होती.

‘दिल जाने जिगर तुझ पे निसार’ हे गाणे 12 एप्रिल 1996 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटातील आहे. डेव्हिड धवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटात गोविंदा, करिश्मा कपूर आणि तब्बू प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्यासोबत कादर खान, सतीश कौशिक आणि सतीश शाह यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

Loading...

हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी प्रकारातील होता. प्रेम, नात्यांमधील गुंतागुंत आणि विनोदाची उत्तम सांगड या चित्रपटात घालण्यात आली होती.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा श्याम सुंदर नावाच्या एका साध्या गावातील तरुणाभोवती फिरते. त्याला संगीताची प्रचंड आवड असते आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत येतो. येथे त्याची भेट मुथुस्वामीशी होते. पुढे त्याचे नशीब बदलते आणि तो एका मोठ्या कंपनीत नोकरी करू लागतो.

याच काळात त्याच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री होते. मात्र, कथेत अनपेक्षित वळण येते आणि श्याम सुंदर दोन लग्नांच्या गुंतागुंतीत अडकतो. त्यानंतर सुरू होणारा विनोद आणि गोंधळ गोविंदाने आपल्या खास अभिनयशैलीतून अधिक रंगतदार केला.

बॉक्स ऑफिसवर चित्रपट सुपरहिट

‘साजन चले ससुराल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात सुमारे 14.33 कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. या वेबसाइटने चित्रपटाला ‘सुपरहिट’ असा दर्जा दिला आहे.

चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास 30 वर्षे झाली असली तरी त्यातील गाणी आजही संगीतप्रेमींच्या आवडीची आहेत. विशेषतः ‘दिल जाने जिगर तुझ पे निसार’ हे गाणे ऐकले की 90 च्या दशकातील रोमँटिक गाण्यांचा काळ आठवतो. करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या जोडीने सजलेले हे गाणे आजही जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us