
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल (Vicky Kaushal) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. जरा हटके जरा बचके हा विकी काैशल याचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. जरा हटके जरा बचके चित्रपटात विकी काैशल याच्यासोबत सारा अली खान (Sara Ali Khan) ही मुख्य भूमिकेत दिसली. सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. जरा हटके जरा बचके हा चित्रपट (Movie) सुपरहिट नक्कीच ठरला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
जरा हटके जरा बचके या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा अली खान आणि विकी काैशल हे दिसले. शेवटी या चित्रपटाने धमाका केलाय. सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना कतरिना कैफ ही देखील दिसली. कतरिना कैफ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मजेदार असा चित्रपट पाहण्याची विनंती आपल्या चाहत्यांनी केली.
आता नुकताच विकी काैशल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना विकी काैशल दिसलाय. विकी काैशल याने यावेळी चक्क कतरिना कैफ हिच्याबद्दलच खुलासा केलाय. विकी काैशल याने यावेळी थेट म्हटले की, माझ्या आयुष्यामध्ये कतरिना कैफ ही एका पोलिसाच्या भूमिकेत आहे.
कतरिना कैफ ही मला सतत प्रश्न विचारत असते. तू हाच शर्ट का घालता? कोणता शर्ट घातला, ही जीन्स का नाही घातली वगैरे वगैरे तिचे सतत प्रश्न असतात. मी असा व्यक्ती आहे की, माझ्या कपाटमध्ये खूप कमी कपडे असतात. चार शर्ट, चार टी शर्ट आणि डेनिमच्या चार जोडी फक्त इतकेच. आता माझ्या या सवयीला कतरिना कैफ देखील कंटाळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिने मला कपड्यांबद्दल बोलणे सोडून दिले आहे. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केले. डेट केल्यानंतर विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न करण्याचा निर्णय शेवटी घेतला. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे लग्नगाठ बांधलीये.
काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, कतरिना कैफ हिच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. कतरिना कैफ हिचा फोन भूत हा चित्रपट फ्लाॅप गेला. कतरिना कैफ ही फोन भूत चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसली. कतरिना कैफ हिच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या.