Ketaki Mategaonkar : लग्नाआधी किमान 6 महिने तरी… लग्नानंतर आयुष्यात होणार बदलांवर केतकी माटेगावकर स्पष्टच म्हणाली, विधान सर्वत्र चर्चेत

Ketaki Mategaonkar : लग्नानंतर फक्त एका स्त्रीच्या आयुष्यातच नाहीतर, एका पुरुषाच्या आयुष्यात देखील अनेक बदल होत असतात आणि ते बदल जर स्वीकारता आले नाहीत तर वाद होतात. यावर अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने स्पष्ट विधान केलं आहे.

Ketaki Mategaonkar :  लग्नाआधी किमान 6 महिने तरी...  लग्नानंतर आयुष्यात होणार बदलांवर केतकी माटेगावकर स्पष्टच म्हणाली, विधान  सर्वत्र चर्चेत
Ketaki Mategaonkar
| Updated on: Nov 04, 2026 | 7:41 AM

Ketaki Mategaonkar : लग्नानंतर एका स्त्रीला अनेक प्रसंगातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. सध्याची परिस्थितीबद्दल सांगायचं झालं तर, स्त्रीला फक्त घरच नाहीतर, करियर देखील सांभाळाचं असतं. अशात लग्नाआधी आणि लग्नानंतर आयुष्यात होणाऱ्या बदलांवर अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त केतकी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. केतकी म्हणते, ‘लग्नाआधी स्त्री आणि पुरुषाने किमान 6 महिने तरी एकटं राहिलं पाहिजे…’, असं केतकी का म्हणाली ते जाणून घ्या.

मुलाखतीत केतकी हिला विचारण्यात आलं की, स्वतःचं घर लग्नाआधी घेणं… हे आजच्या स्त्रीसाठी किती महत्त्वाचं आहे? यावर केतकी माटेगावकर स्पष्टच म्हणाली की, ‘लग्नाआधी स्वतःचं घर मला फार महत्त्वाचं वाटतं. लग्न होण्यापूर्वीचा जो मधला काळ आहे, तो फार महत्त्वाचा असतो. त्या काळात दोघांनी किमान 6 महिने एकटं राहिलं पाहिजे. तर एकटं का राहून का पाहवं, त्यामागे कारण असं आहे की, एकटं राहिल्यामुळे पुढच्या अनेक गोष्टी मार्गी लागतात. कधी कधी काय होतं की, अगं हे कुठे आहे, ते कुठे आहे… असं आहे… जर 6 महिने एकटं राहिलं की, कळतं की, सर्व गोष्ट आपण आपल्या स्वतः करु शकतो.’

Loading...

पुढे केतकी माटेगावकर म्हणाली, ‘त्या काळात जर आपण आपली कामं एकट्याने केली तर, लग्नानंतर कळतं की, समोरचा माणूस आपल्यासाठी काय करत आहे. त्याची किंमत तुम्हाला राहते…ही गोष्ट दोघांसाठी लागू होते. नंतर भाडणं होण्यापूर्वी, दोघे एकत्र बोलून पाहा, चर्चा करा… मला असं वाटतं की, एका पुरुषाला जेवण बनवता आलं पाहिजे, घरातली कामं करता आली पाहिजे आणि स्त्रीने देखील बाहेरची कामं करायला पाहिजे. तिने जाऊन बँकेची कामं, काही कागदपत्रांची कामं करायला पाहिजे . म्हणजे दोघांनी देखील समानतेने राहिलं पाहिजे..’, असं केतकी म्हणाली.

केतकी माटेगावकर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, आज तिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. केतकी फक्त तिच्या अभिनयाने चाहत्यांचं मनोरंजन करत नाही तर, तिच्या गोड आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध देखील करते. टाईमपास’, ‘टाईमपास 2’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘शाळा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत केतकी माटेगावकर हिने चाहत्यांच्या मनात फार कमी वेळात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us