
मुंबई : बोनी कपूर यांची लेक आणि जान्हवी कपूर हिची लहान बहीण खुशी कपूर ही लवकरच बाॅलिवूड चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. खुशी कपूर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. खुशी कपूर आपल्या चाहत्यांसाठी सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतंय. मात्र, बोल्ड फोटो शेअर करणे खुशी कपूर हिच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. लोक खुशी कपूर हिला सोशल मीडियावर खडेबोल सुनावताना दिसत आहेत. खुशी कपूर हिची ही स्टाईल नेटकऱ्यांना अजिबातच आवडली नसल्याचे दिसतंय.
खुशी कपूर हिची फॅशन पाहून लोक चांगलेच दंग झाल्याचे बघायला मिळतंय. खुशी कपूर ही द आर्चीज या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये धमाका करताना दिसेल. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन हे केले जातंय. खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरूख खान याची लेक सुहाना खान हे एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार आहेत.
खुशी कपूर हिने सोशल मीडियावर तिच्या या लूकमधील काही फोटो शेअर केले. मात्र, खुशी कपूर हिचा हा लूक नेटकऱ्यांना अजिबातच आवडला नसल्याचे बघायला मिळतंय. खुशी कपूर ही नेटकऱ्यांच्या चांगलीच निशाण्यावर आली. एकाने या फोटोवर कमेंट करत लिहिले की, अरे हे काय आहे नेमके? काहीही हा…
खुशी कपूर हिची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्यापूर्वीच खुशी कपूर सतत चर्चेत आहे. मात्र, जान्हवी कपूर हिच्या चित्रपटांना काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. आता खुशी कपूर हिचा हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.
खुशी कपूर हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या वाढदिवसानिमित्त एका खास पार्टीचे आयोजन केले. विशेष म्हणजे सुहाना खान ही या पार्टीमध्ये पोहचली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. खुशी कपूर हिच्या द आर्चीज या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.