Kiara Advani : लाल स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणीचा ग्लॅमरस अंदाज; बेबी बंप फ्लॉन्ट करत ‘कॉफी विथ करण’मध्ये लावली हजेरी

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी दुसऱ्यांदा आई बाबा होणार असल्याची माहिती दिली. पण आता कियाराने बेबी बंप फ्लॉन्ट करत चाहत्यांना खूश केले आहे.

Kiara Advani : लाल स्लिट ड्रेसमध्ये कियारा अडवाणीचा ग्लॅमरस अंदाज;  बेबी बंप फ्लॉन्ट करत कॉफी विथ करणमध्ये लावली हजेरी
Kiara Advani
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 10, 2026 | 3:06 PM

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या दुसऱ्या प्रेग्ननीमुळे चर्चेत आहे. दुसऱ्या प्रेग्नेंसीबद्दल सांगताना तिने सोशल मिडिया पोस्ट करत माहिती दिली होती. पण आता एका नव्या व्हिडिओमध्ये ती बेबी बंप प्लाँट करताना दिसत आहे. तिने लाल रंगाचा थाय- हाय स्लिट ड्रेस परिधान केला असून तिचा हा अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

करण जोहरच्या कॉफी विथ करण या लोकप्रिय शो नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या भागात कियारा
आणि सिद्धार्थ पहिल्यांदाच शोमध्ये दिसणार आहे. प्रोमोमध्ये दोघेही हातात हात घालून एकत्र शोमध्ये प्रवेश करताना दिसतात. यात कियाराने लाल रंगाचा साईड स्लिट ड्रेस, मोकळे व्हेव्ही केस, हलका मेकअप आणि स्टड इअररिंग्स असा लूक केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कियाराचा क्यूटसा बेबी बंप दिसत आहे. तर सिद्धार्थ पांढऱ्या सूट बूटमध्ये दिसत आहे.

Loading...

प्रोमोमध्ये दोघांची करणसोबत चांगलीच धमाल पाहायला मिळते. करणने त्यांना विचारलं की, पडद्यावर साकारलेल्या एखाद्या भूमिकेचा अभिनय ते खऱ्या आयुष्यात किंवा घरी करायला आवडेल का? यावर सिद्धार्थने मिश्किल उत्तर देत ‘ आम्हाला आमचं काम घरी विशेषत: बेडरूममध्ये आणायचं नाही. असं तो म्हणाला,त्याच्या या उत्तरानंतर कियारा आणि करण दोघेही हसताना दिसत आहेत.

यानंतर करणने डेट नाईटबद्दलही एक मजेशीर प्रश्न विचारला. डेट नाईट फक्त जेवण किंवा डेझर्टवर संपणार नाही यासाठी तुम्ही काय करता असं त्याने विचारलं. यावर कियाराने बेबी बंपवर हात ठेवत ‘आता बस झालं’ असं उत्तर दिलं. तिचे हे उत्तर ऐकून सिद्धार्थ आणि करण दोघांनाही हसू आवरता आलं नाही.

कियारा आणि सिद्धार्थने 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न केलं. जुलै 2025 मध्ये त्यांच्या घरी मुलगी सरायाहचं आगमन झालं. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुसऱ्या प्रेग्रीन्सीची गोड बातमी चाहत्यांनी दिली. त्यानंतर कियारा पहिल्यांदाच या शोमध्ये बेबी बंप प्लाँट करताना दिसत आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us