Kiran Mane: ‘.. की एक चविष्ट संजय राऊत तयार होतात’, किरण माने यांची भन्नाट पोस्ट

| Updated on: Jul 05, 2022 | 2:14 PM

आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाबाबत त्यांनी पोस्ट लिहिल्या आहेत. अशीच एक त्यांची भन्नाट पोस्ट सध्या सोशल मीडियावर गाजतेय. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविषयी किरण माने (Kiran Mane) यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

Kiran Mane: .. की एक चविष्ट संजय राऊत तयार होतात, किरण माने यांची भन्नाट पोस्ट
Sanjay Raut and Kiran Mane
Image Credit source: Facebook
Follow us on

विषय सामाजिक असो किंवा राजकीय किंवा एखाद्या सिनेमाचा.. अभिनेते किरण माने नेहमीच आपल्या लेखणीतून मोकळेपणे व्यक्त होतात. आजवर त्यांनी विविध घडामोडींवर फेसबुकवर पोस्ट (FB Post) लिहिल्या आहेत. किंबहुना अशाच एका राजकीय पोस्टमुळे मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला. हा वाद त्यावेळी चांगलाच गाजला होता. आता गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षाबाबत त्यांनी पोस्ट लिहिल्या आहेत. अशीच एक त्यांची भन्नाट पोस्ट सध्या सोशल मीडियावर गाजतेय. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविषयी किरण माने (Kiran Mane) यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात,’ अशी उपरोधिक पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

किरण माने यांची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

‘उरले सुरले तोंडी लावायला ठेवलेत का लोणचं म्हणून सर,’ अशी कमेंट एकाने या पोस्टवर केली. तर ‘ओ बाब्बो, ही कोणती डिशये’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं. लै भारी…. टेम्पटिंग असंही एकाने म्हटलंय. जबराट मिश्रण आहे, असं म्हणत नेटकऱ्यांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षावच केला आहे.

विधानसभेत एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव 164 विरुद्ध 99 मतांनी मंजूर झाला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या सर्व घडामोडींनंतर आज (मंगळवारी) सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाची खिल्ली उडवली. तर शिवसैनिक इरेला पेटला आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्या तर आम्ही 100 हून अधिक जागा नक्कीच जिंकू, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.