Kishori Shahane : टीका करा, प्रश्न विचारा, व्यंगही करा, मुख्यमंत्री असोत किंवा त्यांचं कुटुंब…किशोरी शहाणे यांची पोस्ट चर्चेत

Kishori Shahane Post : किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Kishori Shahane : टीका करा, प्रश्न विचारा, व्यंगही करा, मुख्यमंत्री असोत किंवा त्यांचं कुटुंब...किशोरी शहाणे यांची पोस्ट चर्चेत
| Updated on: Oct 27, 2026 | 6:23 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अमृता यांनी केलेली अनेक वक्तव्य चर्चेत येतात आणि त्यांना ट्रोल केलं जातं. अशातच आता मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ट्रोलिंगवर भाष्य केलं असून ट्रोलिंगचा तीव्र निषेध केला आहे.

किशोरी शहाणे यांची पोस्ट

Loading...

किशोरी शहाणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत किशोरी शहाणे म्हणाल्या की, ‘नवरात्र हा आपल्या हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव म्हणजे देवीची उपासना, भक्ती आणि आपल्या संस्कृतीतील मुल्यांचा जागर. आपल्या संस्कृतीनं आपल्याला अतिथी देवी भव, ही शिकवण दिली आहे. पाहुण्यांचा आदर आणि सन्मान करणं, हा आपल्या संस्कारांचाच एक भाग आहे.’

‘अमृता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या मतांवर प्रत्येकाला सहमत किंवा असहमत होण्याचा अधिकार आहे. मात्र, मतभेद व्यक्त करताना भाषेची मर्यादा आणि स्त्रीचा सन्मान राखणं, तितकंच म्हत्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मताशी असलेला मतभेद, हा त्या व्यक्तीचा अपमान करण्याचा परवाना असू शकत नाही. राजकीय मतभेद असतील तर त्यावर चर्चा होऊ शकते. पण, अश्लील भाषा आणि वैयक्तिक पातळीवर होणारं ट्रोलिंग कदापि समर्थनीय नाही. एका कलाकारालाही हे सहन होऊ शकत नाही. एक कलाकार आणि एक स्त्री म्हणून अशा प्रकारच्या ट्रोलिंगचा मी तीव्र निषेध करते. मतभेद असुद्या पण महिलांचा सन्मान आणि आपल्या भाषेतील सभ्यता जपूया’

 


किशोरी शहाणे यांनी हा व्हिडिओ शेअर करत, ‘टीका करा, प्रश्न विचारा, व्यंगही करा. मुख्यमंत्री असोत किंवा त्यांचं कुटुंब, कोणीही टीकेच्या पलीकडे नाही. पण कोणत्याही महिलेबद्दल अश्लील लिहिणं किंवा तिला धमकावणं म्हणजे मत मांडणं नव्हे. असहमतीला मोकळीक आणि प्रत्येक महिलेला सन्मान, ही भूमिका पक्ष किंवा व्यक्ती पाहून बदलता कामा नये.’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us