Pune Mlc Election Result 2026 : पुण्यातून मोठी अपडेट, शिक्षक मतदारसंघासाठी विजयी मतांचा कोटा ठरला, सानपांना निवडून आणण्याच शिंदेंसमोर चॅलेंज
Pune Mlc Election Result 2026 : पुणे शिक्षक मतदार संघ निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पुण्यात शिक्षक निवडणुकीत किती हजार मत वैध ठरली, शिक्षक मतदार संघासाठी किती हजार मतांचा कोटा ठरला, त्याची आकडेवारी समोर आली आहे.

पुण्यातून एक मोठी बातमी येत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीचा मतांचा कोटा निश्चित झाला आहे. एकूण 51 हजार 511 मत वैध ठरली ठरली आहेत. शिक्षक मतदार संघासाठी 25 हजार 756 मतांचा कोटा ठरला आहे. म्हणजे ही पहिली पसंतीची मतं आहेत. जो उमेदवार हा कोटा पूर्ण करेल तो विजय घोषित होईल. भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर आहेत. पुणे शिक्षक मतदार संघावरुन एकनाथ शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद झाले होते. त्यामुळे या जागेवर शिवसेना-भाजपमध्ये मैत्रीपूर्ण सामना होत आहे. पुणे शिक्षक मतदार संघासाठी शिंद शिवसेनेने आधी मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला. पण नंतर माघार घेतली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पुरस्कृत केलं. जयंत आसगावकर हे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. या तिघांमध्ये मुख्य लढत आहे.
पुण्याचा शिक्षक मतदारसंघाचा सामना हा शिंदे शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण आधी पक्षाचा अधिकृत उमेदवार उभा करुन नंतर माघार घेतली. त्यानंतर एका अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केलं. पुण्यात एकनाथ शिंदे शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त आहे. खरंतर मंगेश चिवटे यांनी या निवडणुकीसाठी मागच्या दोन-तीन वर्षांपासून तयारी केली होती. पण ऐनवेळी त्यांना माघार घ्यायला लावली.
किती टक्के मतदान झालय?
शिंदे शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धंगेकर हे सतत भाजपवर टीका करत होते. आज सुद्धा निकालाच्या दिवशी धंगेकरांनी भाजपवर जोरदार वार केला. “आज खरंतर लोकशाहीचा विजय होईल. विचारांची देवाण-घेवाण करणारे नागरिक आहेत, विचारपूर्वकच मतदान केलं असेल. कोटी रुपये, लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आपण ऐकतोय. आजचा निकाल हा शिक्षक आणि पदवीधरांच्या बाजूने लागेल” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 61 हजार 940 मतदार नोंदणीकृत होते. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत 85.87 टक्के अधिक मतदान झालं होतं.
