तुम्हीही ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये होऊ शकता सहभागी, जाणून घ्या नोंदणी करण्याची पद्धत आणि सर्व प्रक्रिया

| Updated on: Apr 25, 2024 | 4:34 PM

कौन बनेगा करोडपतीबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळते. कौन बनेगा करोडपती 26 एप्रिल म्हणजे उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. आता आपणही कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊ शकतो आणि करोडपती होऊ शकतो. जाणून घ्या कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होण्याची सोप्पी प्रक्रिया.

तुम्हीही कौन बनेगा करोडपतीमध्ये होऊ शकता सहभागी, जाणून घ्या नोंदणी करण्याची पद्धत आणि सर्व प्रक्रिया
Kaun Banega Crorepati
Follow us on

अमिताभ बच्चन हे सध्या त्यांच्या कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीजनमुळे चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी नुकताच खुलासा केला की, एकही ब्रेक न घेता त्यांनी कौन बनेगा करोडपतीची आठ तास शूटिंग केली. यावेळी सेटची झलक दाखवताना देखील अमिताभ बच्चन हे दिसले. कौन बनेगा करोडपतीचे सीजन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. कौन बनेगा करोडपतीला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळताना दिसते. कौन बनेगा करोडपतीच्या 16 व्या सीजनची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

कौन बनेगा करोडपतीचे 16 वे सीजन हे 26 एप्रिल 2024 पासून सुरू होतंय. कौन बनेगा करोडपतीने अनेकांचे जीवन बदलले आहे. लोकांना करोडपती बनवले आहे. काही लोक फक्त अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती होस्ट करत असल्याने बघतात. अनेकांना कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी व्हायचे असते. मात्र, त्याची प्रक्रिया अनेकांना माहिती नाहीये.

केसीबीसाठी आपण दोन प्रकारे नोंदणी करू शकतो. एक पद्धत म्हणजे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर एसएमएसद्वारे पाठवून. दुसरे म्हणजे सोनी लिव्ह अॅपच्या मदतीनेही आपण प्रश्नाचे उत्तर पाठू शकतो. Sony Liv ॲपवर लॉग इन करून तिथे माहिती ही भरावी लागेल. यानंतर यामध्ये ज्यांची निवड झाली, त्यांना मुलाखतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल.

26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर तुम्हाला कौन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन हे बघता येईल. विशेष म्हणजे तुम्ही कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होऊ शकतात आणि करोडपती होऊ शकतात. थेट बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्या पुढे बसून कौन बनेगा करोडपती खेळत त्यांच्याशी गप्पा देखील मारू शकता.

कौन बनेगा करोडपतीच्या नवीन सीजनसाठी अमिताभ बच्चन हे खूप जास्त मेहनत घेताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या आहेत. अमिताभ बच्चन  हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत.