RRR | ‘नाटू नाटू’ गाण्यावर भारतातील कोरियन एम्बेसी स्टाफचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Feb 26, 2023 | 9:43 AM

या गाण्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलं. इतकंच नव्हे तर ऑस्कर पुरस्कारासाठीही 'नाटू नाटू' गाण्याला नामांकन मिळालं आहे. यादरम्यान आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय, ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय.

RRR | नाटू नाटू गाण्यावर भारतातील कोरियन एम्बेसी स्टाफचा भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल
Korean Embassy staff dance
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर संपूर्ण देशभरातून भरभरून प्रेम मिळालं. रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या अभिनयाची आणि नृत्याची जुगलबंधी प्रेक्षकांना खूपच आवडली. म्हणूनच RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारदेखील मिळाला. या गाण्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलं. इतकंच नव्हे तर ऑस्कर पुरस्कारासाठीही ‘नाटू नाटू’ गाण्याला नामांकन मिळालं आहे. यादरम्यान आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय, ज्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय.

या व्हिडीओमध्ये भारतातील कोरियाचे दूतावास हे RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. भारतातील कोरियन दूतावासाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये राजदूत चांग-जे-बोकसोबत एम्बेसीमध्ये काम करणारे इतर कर्मचारीसुद्धा थिरकताना दिसत आहेत. ‘नाटू नाटू RRR डान्स- कोरियाई एम्बेसी इन इंडिया’, असं कॅप्शन लिहित हा डान्सचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. “तुम्हाला नाटू म्हणजे काय माहितीय का”, असाही सवाल या व्हिडीओतून विचारण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

‘नाटू नाटू’ गाण्याची ऑस्करमध्ये एण्ट्री

तब्बल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत प्रतिष्ठित ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्यात भारताच्या तीन चित्रपटांना नामांकनं मिळाली आहत. आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 2002 मध्ये ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. ज्यानंतर आता 95व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये भारताच्या तीन चित्रपटांना वेगवेगळ्या विभागांमध्ये नामांकनं मिळाली आहेत. एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार पटकावल्यानंतर आता ऑस्करमध्ये या गाण्याला नामांकन मिळालं आहे.