‘सरकार तिच नोट बंद करत आहे…!’, 2 हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर प्रसिद्ध अभिनेत्याला कशाची भीती?

'काही तरी करा, सरकारला नोटबंदी करण्यापासून थांबवा...', सरकारला असं का म्हणाला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता? त्याला कशाची भीती? सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या पोस्टची चर्चा...

सरकार तिच नोट बंद करत आहे...!, 2 हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर प्रसिद्ध अभिनेत्याला कशाची भीती?
| Updated on: May 20, 2023 | 11:18 AM

मुंबई : लवकरच २ हजार रुपयांची नोट भरतीय चलनातून बाद होणार आहे. २ हजार रुपयांच्या नाटीमध्ये एक चीप होती, ज्यामुळे काळं धन जमा करण्यासाठी कोणताही मार्ग नव्हाता असे दावे करण्यात आले होते. नोटीमध्ये चीप असल्यामुळे काळ धन कोणत्या ठिकाणी ठेवलं असल्याचा शोध घेणं सोपं असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी, 19 मे रोजी 2000 रुपयांच्या (Note) नोटा चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. अचानक हा निर्णय घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.

शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने एक सर्कुलर जारी करत, २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या सर्वत्र याच गोष्टीची चर्चा सुरु आहे. शिवाय लोकांमध्ये देखील यावर अनेक चर्चा सुरु आहेत. अशात बॉलिवूड अभिनेता आणि विश्लेषक कमाल राशिद खान उर्फ केआरके याने नोटबंदीबद्दल एक ट्विट केलं आहे. सध्या अभिनेत्याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

केआरके याने ट्विट करत वरिष्ठ पत्रकार सुधीर चौधरी यांची खिल्ली उडवली आहे… ‘२ हजार रुपयांच्या बँकनोटीमध्ये चीप असल्यामुळे, सरकारला सर्व माहिती मिळत होती आणि काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे संपला होता. आता सरकार तिच नोट बंद करत आहे! तर भाई दहशतवाद पुन्हा वाढणार! काहीतरी करा! सरकारला नोटाबंदी करण्यापासून थांबवा…’ असं केआरके ट्विट करत म्हणाला आहे.

सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त केआरके याच्या ट्विटची चर्चा रंगत आहे. अभिनेत्याच्या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. एक युजर म्हणाला, ‘भाई ती चीप व्यवस्थित काम करत नसेल म्हणून नोट पुन्हा मागत आहेत..’, तर दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘आता ५ हजार रुपयांची नोट येईल असं वाटतं…’ सध्या सर्वत्र २ हजार रुपयांची नोट बंद केल्यामुळे चर्चा रंगत आहे.