Big Boss-16 : द कपिल शर्मा शोमधील ‘ही’ व्यक्ती होस्ट करणार बिग बॉसमधील खास भाग

कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर प्रथमच कृष्णा अभिषेक  बिग बॉस 16 मध्ये एक विशेष विभागात सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. या विशेष भागात तो स्पर्धकांच्या सोबत विनोद करताना , गेम्स खेळताना तसेच बिगबॉस मधून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या सोबत संवाद साधताना दिसून येणार आहे.

Big Boss-16 : द कपिल शर्मा  शोमधील ही व्यक्ती होस्ट करणार बिग बॉसमधील खास भाग
krushna Abhishek
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 01, 2022 | 6:02 PM

टीव्ही  बहुप्रतिक्षित  शो बिग बॉस-16(Big Boss-16) लवकरच सुरु होत आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे, ती स्पर्धकांची. या सिझनमध्ये नेमकं कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे लक्ष लागले आहे. याच दरम्यान शो च्या प्रोमोमधून  दिलचस्प माहिती समोर येत आहे . या सीझनमध्ये कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma Show)मधील कृष्णा अभिषेक(Krushana Abhishek) या शो मध्ये सहभागी होणार आहे.

द कपिल शर्मा शो सोडल्यानंतर कृष्णा अभिषेक प्रथमच रियॅलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून नाही तर होस्ट म्हणून सभागी होत आहे. बिग बॉसमधील बिग बझ नावाचा विशेष भाग होस्ट करताना दिसून येणार आहे. कृष्णा आपल्या आर्कषक स्टाईलमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नवीन काय पाहायला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर प्रथमच कृष्णा अभिषेक  बिग बॉस 16 मध्ये एक विशेष विभागात सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. या विशेष भागात तो स्पर्धकांच्या सोबत विनोद करताना , गेम्स खेळताना तसेच बिगबॉस मधून बाहेर पडलेल्या स्पर्धकांच्या सोबत संवाद साधताना दिसून येणार आहे. बिगबॉस च्या या सिझनमधील आहे विशेष भाग मनोरंजक असून निश्चितच चाहत्यांच्या पसंतीस उतरणार आहे.

बिग बझ च्या आयोजन बाबत बोलताना कृष्णा म्हणाला की ‘मी बिग बझ होस्ट कारण्याबाबत खूपच उत्सुक आहे. मी खूप आनंदी आहे . जिथे मला बाहेर पडलेल्या स्पर्धकांचा वर्ग घेण्याची आणि प्रेक्षकांसोबतअनेक मजेशीर गोष्टी मला शेअर करतानायेणार आहेत.  बिग बॉसच्या घरातीलस्पर्धकांचे क्लास घेण्याची संधी मला मिळणार आहे. याबरोबरच “शोच्या नवीन फॉर्मेटसह, मी त्याला आणखी वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आह.