Kushal Badrike: ‘तुमच्या या न्यूजमुळे आता ती..’, ‘रानबाजार’विषयी पोस्ट लिहिताना कुशल बद्रिकेला एक चूक पडली महागात!

अभिनेता कुशल बद्रिकेनंसुद्धा (Kushal Badrike) नुकतीच ही सीरिज पाहिली आणि त्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्यातील कलाकारांचं कौतुक करण्यासाठी एक पोस्ट लिहिली. मात्र ही पोस्ट लिहिताना कुशलकडून एक चूक झाली.

Kushal Badrike: तुमच्या या न्यूजमुळे आता ती.., रानबाजारविषयी पोस्ट लिहिताना कुशल बद्रिकेला एक चूक पडली महागात!
Kushal Badrike
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 2:02 PM

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘रानबाजार’ (Raanbazaar) ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या वेब सीरिजचं कौतुक काही मराठी कलाकारांनीसुद्धा केलं आहे. अभिनेता कुशल बद्रिकेनंसुद्धा (Kushal Badrike) नुकतीच ही सीरिज पाहिली आणि त्यानंतर त्याने सोशल मीडियावर त्यातील कलाकारांचं कौतुक करण्यासाठी एक पोस्ट लिहिली. मात्र ही पोस्ट लिहिताना कुशलकडून एक चूक झाली. याच चुकीमुळे त्याला आणखी एक पोस्ट लिहित अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) माफी मागावी लागली. कुशलचे हे दोन्ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडितसोबतच इतरही कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अभिजीत पानसे यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.

कुशल बद्रिकेची पहिली पोस्ट-

‘रानबाजार- एक कमाल वेब सीरिज. वेब सीरिजची टीपिकल गणितं मोडत, समाजाचं आणि राजकारणाचं वास्तव चित्र दाखवणारी ही सीरिज कथेच्या नायकातलं, अती-सामान्यपण आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत राहते. सिस्टीम नावाची एक निर्जीव गोष्ट आपल्यातला जिवंतपणा संपवून टाकते हेच खरं. अभिजीत पानसे , तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार यांचा भारावून टाकणारा परफॉर्मन्स या सीरिजचा आत्मा ठरतो. पर्सनली मला ही वेब सीरिज खूप आवडली आणि जाता जाता ते.. “कुंडी लगालो सय्यां” गाणं काहीच्या काही केलंय,’ अशा शब्दांत कुशलने वेब सीरिज आणि त्यातील कलाकारांचं कौतुक केलं.

पहा पोस्ट-

कुशलच्या या पोस्टमधली एक बाब नेटकऱ्यांनी त्याच्या निदर्शनास आणून दिली. त्याने या पोस्टमध्ये प्राजक्ता माळीचा उल्लेखच केला नव्हता. तिनेसुद्धा खूप छान अभिनय केलाय, असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केली. प्राजक्ताला कसं विसरलास, असाही सवाल काहींनी केला. त्यानंतर कुशलने आणखी एक पोस्ट लिहिली. एका वेब पोर्टलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत कुशलने ही नवी पोस्ट लिहिली.

पहा पोस्ट-

कुशलची दुसरी पोस्ट-

‘मी समस्त न्यूज मीडिया आणि विशेष प्राजक्ता माळीचे चाहते यांची क्षमा मागतो. प्राजक्ताचं नाव लिहायचं चुकून राहिलं. प्राजक्ता, पांडू या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीणसुद्धा आहे. तुमच्या या न्यूजमुळे आता ती बहुतेक दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटणं, तेल वगैरे गिफ्ट म्हणून पाठवते ते पाठवणार नाही. तुम्हाला त्याचं पाप लागेल आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल. प्राजक्ता तू मस्त काम केलंस यार . तुला पर्सनली सॉरी म्हणतो. बाकी सगळ्या कलाकारांनीच काय तर त्या घुबडानेसुद्धा भारी काम केलंय,’ अशी पोस्ट त्याने लिहिली. कुशलच्या या पोस्टवर अनेकांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी त्याच्या विनोदबुद्धीचं कौतुक केलं आहे.