Koffee With Karan : ‘कॉफी विथ करण’मध्ये सलमान खानला मिळणार सरप्राईज ? ही अभिनेत्री लावणार हजेरी

Koffee With Karan Season 9 : 'कॉफी विथ करण'च्या शेवटच्या सीझनचा पहिला एपिसोड आज टेलिकास्ट होणार वआहे. सलमान खान या शोमध्ये पहिला पाहुणा म्हणून येणार आहे. पण फक्त तोच नव्हे, तर आणखी एक अभिनेत्री देखील करण जोहरच्या चॅट शोमध्ये येणार असून सलमान खानसाठी ते सरप्राईज ठरू शकतं.

Koffee With Karan : कॉफी विथ करणमध्ये सलमान खानला मिळणार सरप्राईज  ? ही अभिनेत्री लावणार हजेरी
| Updated on: Oct 14, 2026 | 4:35 PM

Koffee With Karan Season 9 : ‘कॉफी विथ करण’चा 9 वा आणि अखेरचा सीझन घेऊन करण जोहर येत आहे. आज, 14 ऑक्टोबर रोजी या चॅट शोचा शुभारंभ होत असून हा शेवटचा सीझन ठरणार आहे. पहिल्याच एपिसोडमध्ये बॉलिवूडचा भाईजान, दबंग स्टार सलमान खान हजेरी लावणार आहे. या शोचा प्रोमो तर कधीच समोक आला होता, ज्यात सलमान खान आणि करण विविध विषयांवर बोलताना दिसले. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, फक्त सलमानच नव्हे तर आणखी एक सेलिब्रिटी देखील या शोमध्ये येणार. हो, हे खरं आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरही करण च्या शोच्या पहिल्या भागात दिसणार आहे. मात्र ती नेमकी कधी येणार आणि किती वेळ या एपिसोडमध्ये असणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

करण जोहरचा हा चॅट शो शेवटचा सीझन असल्यामुळे आधीपासूनच चर्चेत होता. त्यानंतर प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खान दिसणार असल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली. त्यातच करिश्मा कपूरच्या विशेष उपस्थितीबद्दल समजल्यानंतर प्रेक्षक या एपिसोडची अधिकच आतुरतेने वाट पाहत आहेत.

Loading...

सलमान आणि करिश्मा कधी दिसले होते एकत्र ?

‘कॉफी विथ करण’मध्ये दोघांची एकत्र पहिल्यांदाच झलक पाहायला मिळणार असली, तरी चित्रपटांमध्ये हे दोन्ही कलाकार अनेकदा एकत्र दिसले आहेत. सलमान आणि करिश्माचा पहिला चित्रपट ‘जागृती’ हा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी दोघे ‘निश्चय’ या चित्रपटातही एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांनी ‘अंदाज अपना अपना’, ‘जुडवा’, ‘बीवी नंबर 1’ आणि ‘दुल्हन हम ले जाएंगे’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं

‘कॉफी विथ करण सीझन 9’चा पहिला एपिसोड आज, बुधवार, 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता जिओहॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. या पहिल्या एपिसोडमध्ये सलमान खान एकटाच पाहुणा म्हणून दिसणार आहे. या शोमध्ये सहसा दोन सेलिब्रिटी एकत्र पाहुणे म्हणून सहभागी होत असतात. करिश्मा कपूर या शोमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारे आणि किती वेळासाठी दिसणार, हे पहिला एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

सलमानचे आगामी चित्रपट

सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झाले, तर तो सध्या आपल्या पुढील ‘मॉन्स्टर’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक वामशी पैडिपल्ली या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर दिल राजू या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us