Koffee With Karan : ब्लॅक लूक, हातात फेमस ब्रेसलेट अन् भाईजानचा स्वॅग ! ‘कॉफी विथ करण’मध्ये सलमानची एंट्री; Video

निर्माता-दिगद्र्शक करण जोहर हा त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा शेवटचा सीझन घेऊन येत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. त्यातच आता एका खास गेस्टचा व्हिडीओ देखील समोर आलाय, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकात वाढली आहे.

Koffee With Karan : ब्लॅक लूक, हातात फेमस ब्रेसलेट अन् भाईजानचा स्वॅग ! ‘कॉफी विथ करण’मध्ये सलमानची एंट्री; Video
| Updated on: Oct 12, 2026 | 8:22 PM

निर्माता-दिगद्र्शक करण जोहर याचा ‘कॉफी विथ करण’ हा सेलिब्रिटी चॅट शो खूपच लोकप्रिय आहे. गेल्या अनेक वर्षांत या चॅट शोचे 8 सीझन आले असून, आता लौकरच या शोचा 9वा आणि शेवटचा सीझन येणार आहे. या शोची अनाऊन्समेंट झाली असून याच आठवड्यात तो प्रेक्षकांना पाहताही येणार आहे. बॉलिवूडचे अनेक स्पर्धक या शोमध्ये हजेरी लावणार असून फिल्म इंडस्ट्रीचा दबंग स्टार, अर्थात सलमान खानही कसा मागे राहील ? करण जोहरच्या या शोमध्ये सलमान खानदेखील हजेरी लावणार असून खुद्द करणनेच सलमानसोबतचा एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या एंट्रीची ऑफिशिअल घोषणा केली आहे.

सलमानचीही हजेरी

Loading...

या आठवड्यात म्हणजेच 14 ऑक्टोबरपासून ‘कॉफी विथ करण’चा 9वा सीझन येत असून तो वर्ल्डवाईड टेलिकास्टदेखील होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सलमानच्या एंट्रीचाही व्हिडीओ आता समोर आला आहे. ब्लॅक शर्ट, ब्लॅक पंट, हातात ते फेमस ब्रेसलेट, ईअररिंग्स, गळ्यात चेन आणि दमदार, कूल अंदाज अशा रूपात करण जोबरसोबत ‘कॉफी विथ करण’च्या सेटवर सलमान खान दिसला. One last time…a koffee with the one & only bhaii🤝 – अशी कॅप्शन करण जोहरने या व्हिडीओसोबत दिली आहे.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा तो चांगलाच चर्चेत येतो. या शोमध्ये करण जोहर बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांसोबत गप्पा मारताना दिसतो. शोमध्ये तो कलाकारांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक प्रश्न विचारतो. तसेच, या शोमध्ये कलाकारांना रॅपिड फायर राऊंडही खेलतात. मात्र, हा शो अनेकदा वादांच्याही भोवऱ्यात सापडला आहे.

 

बराच गाजला होता कंगनाचा वाद

काही वर्षांपूर्वी, अभिनेत्री कंगना रानौत या शोमध्ये आली होती. तिच्या त्या एपिसोडमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या (नेपोटिझम) मुद्द्यावर मोठी चर्चा सुरू झाली होती. कंगनाने करण जोहरच्या शोमध्ये जाऊन त्याच्यावर घराणेशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता. तसेच, तिने करणला ‘मूव्ही माफिया’ असेही म्हटले होते. यावरून बराच वाद झाला होता. तसेच क्रिकेटर, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या हे दोघेही या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये हार्दिक पंड्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही वक्तव्यं केली होती. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

सलमानचं काम

सलमान खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ या फिल्ममध्ये दिसणार आहे. हाँ चित्रपट बऱ्याच काळापासून पोस्टपोन होत आहे. आधी तो एप्रिलमध्ये रिलीज होणार होता आणि त्याचं टायटलदेखील ‘बॅटल ऑफ गलवान’ असं ठेवण्यात आलं होतं. मात्र आता चित्रपटानाव बदलून मातृभूमि – असं ठेवण्यात आलं आहे. असं असलं तरीव हाँ चित्रपट नेमका कधी रिलीज होणार, याची तारीख मात्र अद्याप घोषित करण्यात आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us