लग्नाच्या 11 दिवसांत पतीचे निधन, दुसऱ्या लग्नावेळी 9 महिने प्रेग्नंट; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?

अशी एक अभिनेत्री जिचे आयुष्य कोणत्या चित्रपटापेक्षा कमी राहिलेले नाही. पहिल्या लग्नात लग्नानंतर केवळ 11 दिवसानंतरच पतीचे निधन झाले. तर दुसऱ्या लग्नात ही अभिनेत्री 9 महिने प्रेग्नंट होती. या अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. 

लग्नाच्या 11 दिवसांत पतीचे निधन, दुसऱ्या लग्नावेळी 9 महिने प्रेग्नंट; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
leena chandavarkar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2025 | 4:14 PM

लीना चंदावरकर ही बॉलिवूडमधील अशा नायिकांपैकी एक आहे ज्यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले. पण तिने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. लीनाचे नाव येताच ‘मेहबूब की मेहंदी’, ‘हमजोली’ आणि ‘मंचली’ सारखे चित्रपट आठवतात.

या अभिनेत्रीची रिल आयुष्यापेक्षा रिअल आयुष्याबाबत जास्त चर्चा

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या रिल आयुष्यापेक्षा रिअल आयुष्य जास्त चर्चेत राहिलं आहे. अशीच एक अभिनेत्री जिचे खरे आयुष्य हे कोणत्याही फिल्मपेक्षा कमी नाही. लग्नाच्या 11 दिवसानंतरच पतीचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर दुसऱ्या लग्नावेळी तर ही अभिनेत्री चक्क 9 महिने प्रेग्नंट होती. ही अभिनेत्री म्हणजे 70 च्या दशकातील प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री लीना चंदावरकर. त्यांनी अनेक सुंदर भूमिका साकारून चित्रपट यशस्वी केले होते.

एकापेक्षा एक हीट चित्रपट

या अभिनेत्रीला पहिला ब्रेक प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माता-दिग्दर्शक सुनील दत्त यांच्याकडून मिळाला. खरंतर, त्यांनी पहिल्यांदा ‘मसीहा’ चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते, पण काही कारणास्तव तो चित्रपट होऊ शकला नाही. त्यानंतर सुनील दत्तने तिला 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मन का मीत’ चित्रपटात विनोद खन्ना यांच्यासोबत कास्ट केले. हा चित्रपट केवळ हिट झाला नाही तर लीना चंदावरकर यांना चित्रपटसृष्टीत एक खास ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.

लग्नानंतर अवघ्या 11 दिवसांत पतीचे निधन 

जेव्हा तिची चित्रपट कारकीर्द शिखरावर होती. तेव्हा तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1984 मध्ये तिने गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थ बांदोडकरशी लग्न केले. लग्नानंतर लीनाने चित्रपटांपासून स्वतःला लांब ठेवण्याचा विचार केला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या 11 दिवसांत त्यांचे पती सिद्धार्थ यांचे निधन झाले. सिद्धार्थला बंदूक साफ करताना चुकून गोळी लागली. त्यांना अशाच गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याच्यावर सुमारे 11 महिने उपचार करण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. लीना वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी विधवा होणे नशीबी आले.

किशोर कुमार अभिनेत्रीच्या प्रेमात पडले 

पुढे त्यांनी स्वत:ला सावरत आपलं काम पुन्हा सुरु केलं. त्या गायक किशोर कुमार यांच्यासोबत ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. शूटिंग दरम्यान, किशोर कुमारला यांना त्या आवडू लागल्या आणि त्यांनी लीनाला लग्नाचा प्रस्ताव दिला. लीना चंदावरकर यांनी स्वतः एका मुलाखतीत हे सांगितले. त्या म्हणाल्या की, “मी किशोर कुमारला पहिल्यांदा आमच्या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो आणि संजीव कपूरने मला सांगितले होते की मी त्याला राखी बांधावी, अन्यथा तो माझ्याशी लग्न करेल. त्यावेळी मला माहित नव्हते की त्याने सांगितलेले एक दिवस खरे ठरेल.”

लग्नात 9 महिन्यांची प्रेग्नंट होती अभिनेत्री 

नंतर, जेव्हा लीनाच्या कुटुंबाला हे कळले तेव्हा त्यांनी खूप विरोध केला, कारण किशोर कुमार हे लीनापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते तसेच तर त्यांची तीन लग्न झाली होती. पण अखेर लीना आणि किशोर कुमार यांच्या नात्याला त्यांच्या घरच्यांनी स्वीकारलं आणि नंतर त्यांनी लग्न केलं. लीना आणि किशोर कुमार यांनी दोनदा लग्न केलं. पहिले कोर्ट मॅरेज आणि नंतर हिंदू रितीरिवाजानुसार. लग्नाच्या वेळी लीना 9 महिन्यांची प्रेग्नंट होती.लग्नानंतर त्यांचा मुलगा सुमित कुमारचा जन्म झाला. पण हा आनंदही जास्त काळ टिकू शकला नाही. किशोर कुमार यांचे 1987 मध्ये निधन झाले, तेव्हा लीना फक्त 37 वर्षांच्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी पुन्हा लग्न केले नाही आणि आयुष्यभर त्यांच्या मुलासोबत त्यांनी वेळ घालवला.