AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चला निघा, आम्हाला कोणाचीही गरज नाही… डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र देशांवर भयंकर संताप, थेट..

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेने काही थेट काही देशांची मदत मागितली. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीला धावून आला नाही. चीनवर दबाव टाकला जात आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे विधान केले.

चला निघा, आम्हाला कोणाचीही गरज नाही... डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्र देशांवर भयंकर संताप, थेट..
Donald Trump
| Updated on: Mar 17, 2026 | 12:09 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 18 दिवस आहे. मात्र, या युद्धात अमेरिकेला दणका बसला. अमेरिकेला अजिबातच वाटले नव्हते की, इराण इतका जास्त भयंकर होऊन हल्ल्यांना उत्तर देईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये इराणने अमेरिकेला सळो की, पळो करून सोडले आहे. होर्मुज खाडी इराणकडून अमेरिका आणि इस्त्रायलसह त्यांना मदत करणाऱ्या देशांकरिता बंद ठेवण्यात आली. होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. यादरम्यानच होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता अमेरिकेने थेट मित्र देशांना मदत मागितली. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे आला नाही. अमेरिकेने स्वप्नातही वाटले नव्हते की, आपल्या मदतीला कोणीच येणार नाही. एकाही देशाने मदतीकरिता होर्मुज खाडीत युद्धनाैका पाठवली नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढला आहे.

नाटो देशांनाही धमकावताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. डोनाल्ड ट्रम्प अनेक धमक्या देत आहेत. मात्र, इराण त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. उलट इराणने थेटपणे म्हटले की, हिमत असेल अमेरिकेने होर्मज खाडीत फक्त युद्धनाैका आणूनच दाखवावी. इराणसोबतच्या युद्धात अमेरिका एकटी पडल्याचे दिसत आहे. कोणताही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे येत नाहीये.

अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट मोठी टीका करण्यात आली आणि इशाराही देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांवर टीका करत म्हटले की, आम्हाला कोणाचीही गरज नाही. आम्ही जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र आहोत. आमचे सैन्य सर्वात शक्तीशाली आहे. थोडक्यात काय तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात आपल्याला कोणाचीही गरज नसल्याचे स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एका बाजूला म्हटले की, आम्ही जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र आहोत. मात्र, सध्याच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही होर्मुज खाडीत लष्कर उतरवले जात नाही. इराण वाट पाहून आहे की, कोणत्या क्षणी अमेरिका आपली युद्धनाैका तिथे उतरवते. अगोदरच इराणकडून मोठा इशारा अमेरिकेला देण्यात आला. या युद्धात अमेरिका फसल्याचे दिसत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल