AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल धक्कादायक माहिती, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनाही आश्चर्य, थेट..

इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल विविध दावे केले जात आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात मोजतबा खामेनेई गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यानच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल धक्कादायक माहिती, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनाही आश्चर्य, थेट..
Mojtaba Khamenei
| Updated on: Mar 17, 2026 | 11:33 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेने आणि इस्त्रायलने ज्यापद्धतीने इराणवर हल्ला केला होता, त्यावेळी कोणीही विचार केला नाही की, हे युद्ध इतके दिवस चालेल. कारण पहिल्याच हल्ल्यात इराणच्या सर्वाेच्च नेत्याला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसोबत ठार करण्यात आले. त्यानंतर इराण हत्यार टाकेल आणि आत्मसमर्पण करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर इराण ज्यापद्धतीने पेटून उठला, त्याचा कोणी साधा विचारही केला नव्हता. या युद्धादरम्यानच आता धक्कादायक बातमी पुढे येताना दिसत आहे. इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल ही बातमी आहे. अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालानुसार, इराणचे नवे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनेई हे समलैंगिक असल्याचे सांगितले जाते. याबद्दल स्वत: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भाष्य केले आणि यावर विश्वास बसत नसल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. गुप्तचर बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांना ही माहिती कळाली.

अहवालानुसार, ही गोपनीय बैठक पार पडली. यामध्ये अमेरिकी संस्थांनी तपासलेली माहिती देण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांना सांगण्यात आले की, मोजतबा खामेनेई समलैंगिक आहेत, तेव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प थेट हसतानाही दिसले. अमेरिकी गुप्तचर संस्था हा दावा विश्वसनीय मानतात. ही माहिती खोटी नसल्याचा त्यांचा दावा आहे.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही माहिती एका अत्यंत खास स्रोताकडून आली आहे. हेच नाही तर एका सूत्राने यादरम्यान सांगितले की, लहानपणापासूनच मोजतबा खामेनेई यांचे एका शिक्षकासोबत संबंध राहिले आहेत. त्यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी याबद्दल इराणमध्येही चर्चा सुरू होत्या.

आता ही मोठी माहिती थेट अमेरिकेच्या हाती लागली आहे. हे. इराणचे सर्वाेच्च नेते मोजतबा खामेनेई समलैंगिक असल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी केल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. मात्र, यादरम्यान अजून इराणकडून कोणतेही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. मोजतबा खामेनेई यांच्या तब्येतीबद्दल विविध दावे केले जात आहेत. त्यामध्येच आता ही माहिती पुढे आली.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल